Coronavirus: कोरोनापासून रुग्णांचा बचाव करणाऱ्या डॉक्टरलाच धमकी!

Coronavirus: कोरोनापासून रुग्णांचा बचाव करणाऱ्या डॉक्टरलाच धमकी!

देशामध्ये कोरोना व्हायरस सारख्या संकटाच्या विरोधात युद्ध सुरू आहे. या युद्धात हजारो वैद्यकीय कर्मचारी सर्वात महत्वाची भूमिका निभावत आहेत. हे वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स दिवसरात्र रुग्णालयात अत्यावश्यक सेवेत कार्यरत आहेत. परंतु असे असूनही, काही व्हिडीओ आणि फोटो देशाच्या विविध भागातून समोर येत आहेत, ज्यामध्ये कोरोना रूग्णाचा बचाव करणाऱ्या डॉक्टरांनाच गैर वागणूक देण्यात येत आहे. सध्याच्या गंभीर परिस्थितीत काही वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आजूबाजूच्या लोकांसह शेजाऱ्यांच्या अत्याचाराचा सामना करावा लागत आहे. गुजरातमध्ये असाच काहीसा प्रकार उघकीस आला आहे.

सूरत येथील रहिवासी असणाऱ्या डॉक्टर संजीवनी यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले की, माझ्या शेजारच्यांनी मला रूग्णालयात गेल्यानंतर तेथून घरी परत येऊच नको, असे सांगितले. कारण मी कोरोना बाधित रूग्णांची देखरेख करत असते. त्यामुळे त्यांना असे वाटते की मला देखील कोरोनाची लागण झाली असेल. त्यामुळे शेजारच्यांकडून अशाप्रकारची थेट धमकीच देण्यात आली. तसेच शेजारच्यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचे देखील डॉक्टर संजीवनी यांनी सांगितले. दरम्यान डॉक्टर संजीवनी यांना पोलिसांनी मदत केली आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने रुग्णालयात कामाचा व्याप देखील जास्त आहे. विशेष म्हणजे कोरोना सारख्या भयावह संकटातून सुरक्षित वाचवण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील हे वैद्यकीय कर्मचारी जीवापाड मेहनत घेत आहेत. मात्र लोकांचे असे गैरवर्तवणूक योग्य नसून ही सूरतमधील पहिलीच घटना नाही तर यापूर्वी अशा काही घटना दिल्लीसह इतरही अनेक शहरांत उघडकीस आल्या आहेत.


VIDEO- कुटुंबियांपासून दूर; कोरोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या डॉक्टरलाच झाले अश्रू अनावर
First Published on: April 7, 2020 6:57 PM
Exit mobile version