महाराष्ट्रात ‘बुलेट ट्रेन’ साठी लवकरच सर्वेक्षण

महाराष्ट्रात ‘बुलेट ट्रेन’ साठी लवकरच सर्वेक्षण

रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरबाबत सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत लवकरच दिल्ली-वाराणसी, मुंबई-नागपूर, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-हैदराबाद, चेन्नई-बेंगळुरू-म्हैसूर, वाराणसी-हावडा आणि दिल्ली-अमृतसर कॉरिडॉर (बुलेट ट्रेन)चे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी दिली. या सर्वेक्षणानंतर सविस्तर अहवाल तयार केला जाईल, अशी माहितीही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली.

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला (बुलेट ट्रेन) विलंब झाल्याची कबुली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही राज्यसभेत बोलताना दिली. महाराष्ट्रातील भूसंपादनाला होणारा विलंब हे याचे प्रमुख कारण असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दुसरीकडे, कंत्राटांना अंतिम स्वरुप देण्यात आणखी बर्‍याच अडचणी येत आहेत, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.

रेल्वे राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी गुरुवारी गुजरातच्या सुरतमध्ये बांधले जाणारे बुलेट ट्रेन स्टेशन कसे असेल, हे दाखवले. त्यांनी या स्थानकाचे ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असलेले फोटोही शेअर केले होते. मुंबई-अहमदाबाद मार्गावर सर्वप्रथम सुरत बुलेट ट्रेन स्टेशन बांधले जाणार आहे.

First Published on: February 12, 2022 5:10 AM
Exit mobile version