Surya Grahan 2024 : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण; पण भारतात दिसणार का?

Surya Grahan 2024 : आज वर्षातील पहिले सूर्यग्रहण; पण भारतात दिसणार का?

आज 8 एप्रिल रोजी वर्षातील पहिले सूर्यग्रहण आहे. खगोलशास्त्रानुसार, जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होते. वास्तविक, सूर्य चंद्राच्या मागे लपतो आणि त्यामुळे काही काळ अंधार असतो. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या खगोलीय घटना असल्या तरी धर्म आणि ज्योतिष शास्त्रात ग्रहणाला खूप महत्त्व देण्यात आले आहे. तसेच ग्रहणाबाबत अनेक नियम सांगण्यात आले आहेत.

वर्षातील पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिल 2024 रोजी म्हणजेच आज आहे. भारतीय वेळेनुसार हे रात्री 09.12 पासून सुरु होईल आणि मध्यरात्री 02.22 पर्यंत असेल. हे ग्रहण पश्चिम यूरोप, पॅसिफिक, अटलांटिक, आर्क्टिक, मेक्सिको, उत्तर अमेरिका, कॅनडा, मध्य अमेरिका, दक्षिण अमेरिकेचा उत्तरेकडील भाग, इंग्लंड आणि आयर्लंडच्या उत्तर-पश्चिम भागात दिसणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही.

सूर्यग्रहण म्हणजे काय?

वैज्ञानिकदृष्ट्या जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो. अशा स्थितीत चंद्रामुळे सूर्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. हे नेहमी अमावस्येलाच होते.

25 मार्चला होते वर्षातील पहिले चंद्रग्रहण

नुकत्याच काही दिवसांपूर्वी 25 मार्च रोजी वर्षातील पहिले चंद्रग्रहण होते. पण हे ग्रहण देखील भारतात दिसले नाही. या ग्रहणानंतर वर्षभरात आणखी एक सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण होणार आहे. दुसरे सूर्यग्रहण 3 ऑक्टोबर 2023 रोजी आणि वर्षातील दुसरे चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी होणार आहे.


हेही वाचा :

मीन राशीत तयार होणार दोन राजयोग; 3 राशींची होणार चांदी

First Published on: April 8, 2024 3:37 PM
Exit mobile version