‘सुशांतचा घोट्याखालील पाय तुटला होता…’ रुग्णवाहिका चालकाची माहिती – सुब्रमण्यम स्वामी

‘सुशांतचा घोट्याखालील पाय तुटला होता…’ रुग्णवाहिका चालकाची माहिती – सुब्रमण्यम स्वामी

खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूत

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुरुवातीपासून सीबीआयकडून तपास केला जावा अशी मागणी भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी लावून धरली होती. यासाठी त्यांनी या प्रकरणाशी निगडीत काही धक्कादायक दावे आपल्या ट्विटर हँडलवर केले होते. आता पुन्हा एकदा स्वामींनी खळबळजनक असे ट्विट केले आहे. “सुशांतच्या घोट्याखालचा पाय मुरळगलेल्या (तुटलेल्या) अवस्थेत होता, अशी माहिती सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने दिली” असा दावा स्वामी यांनी केला आहे. त्यामुळेच सुशांत्या मृतदेहावर महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयातील ज्या डॉक्टरांनी शवविच्छेदन केले त्यांचीही सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणातील गुंता सोडविण्यासाठी कूपरमधील डॉक्टरांची कसून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. डॉ. आर. सी. कूपर रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी सुशांतच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले होते. मात्र रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या पायाच्या घोट्याच्या खालील भाग फिरलेला (कदाचित तो तुटलेला) होता. त्यामुळे डॉक्टरांची चौकशी होणे गरजेचे असल्याचे स्वामी यांचे मत आहे.

सुशांत सिंह राजपूत १४ जून रोजी त्याच्या मुंबईतील घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेला होता. डॉक्टरांनी सुशांतचा मृत्यूचे कारण आत्महत्याच असून इतर कोणतेही कारण नसल्याचे तेव्हा सांगितले होते.

 

First Published on: August 11, 2020 9:50 AM
Exit mobile version