पाकिस्तानमध्ये कराचीत बाँबस्फोट

पाकिस्तानमध्ये कराचीत बाँबस्फोट

पाकिस्तानमधील कराची शहरात काल मध्यरात्री बॉम्बस्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या बॉम्बस्फोटमुळे परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा स्फोट एवढा भयंकर होता की, या स्फोटचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू गेला. इतकंच नव्हे तर या स्फोटमुळे आजूबाजूला उभ्या असलेल्या वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या बॉम्बस्फोटमुळे कराचीमधील बाजारपेठेत प्रचंड खळबळ उडाली आहे.

३ जणांचा मृत्यू १३ हून अधिक जखमी
सूत्रांच्या माहितीनुसार, या बॉम्बस्फोटत ३ जणांचा मृत्यू झाला असून १३ हून अधिक लोक जखमी झालेले आहेत. या स्फोटमुळे आजूबाजूला उभी असलेल्या वाहने उद्ध्वस्त झाली असून परिसरातील अनेक ठिकाणांचे नुकसान झाले आहे.

सायकलमध्ये ठेवण्यात आला बॉम्ब
खरंतर हा बॉब एका कचराकुंडीच्या शेजारी उभी असलेल्या एका सायकलमध्ये ठेवण्यात आला होता. सूत्रांच्या मते स्फोट झालेल्या ठिकाणांवरून लोकांना हटवण्यात आले आहे. स्फोट झालेल्या ठिकाणी बघ्यांची गर्दी जमू लागली आहे. स्फोटाच्या ठिकाणी असलेल्या घरांच्या आणि हॉटेलच्या काचा फुटलेल्या आहेत.

दहशतवादी हल्ला असल्याचा संशय
पाकिस्तानात सिंध आणि बलुचिस्तानच्या फुट पाडणाऱ्या गटांनी त्याची जबाबदारी स्वीकारली आहे.कराची पोलिस याला दहशतवादी हल्ला म्हणत आहेत.

 

 

First Published on: May 13, 2022 9:25 AM
Exit mobile version