Parliament : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ‘त्या’ आठ खासदारांचे निलंबन

Parliament : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या ‘त्या’ आठ खासदारांचे निलंबन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात रविवारी राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी आज, सोमवारी निलंबनाची कारवाई केली. यानंतर सभागृहाचे कामकाज १०.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. १० वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे पुन्हा कामकाज स्थगित करण्यात आले. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजू सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचा समावेश आहे.

काय आहे प्रकरण 

संसदेचे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू असून त्यामध्ये मंजूर करण्यात आलेले कृषी सुधारणा विषयक विधेयक चर्चेत आले असून त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी या विधेयकाला विरोध करत NDA मधील घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या वरीष्ठ नेत्या आणि केंद्र सरकारमधील मंत्री हरसिमरन कौर बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतरही लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. काल, रविवारी राज्यसभेत हे विधेयक मंजुरीसाठी मांडण्यात आले. मात्र त्यावेळी संसदेचे वरीष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेमध्ये असा राडा पाहिला गेला नव्हता अशी प्रतिक्रिया यानंतर अनेक ज्येष्ठ सदस्यांनी दिली आहे. त्यात आता काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केंद्र सरकारवर आणि राज्यसभेच्या उपसभापतींवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.

हेही वाचा –

‘भल्या पहाटेचे फडणवीसांचे सरकार वाचवण्यासाठी काही अधिकारी राबत होते’

First Published on: September 21, 2020 10:40 AM
Exit mobile version