Sweden riots : कुराण जाळण्याचा प्रयत्नातून स्विडनमध्ये भडकली दंगल

Sweden riots : कुराण जाळण्याचा प्रयत्नातून स्विडनमध्ये भडकली दंगल

Photo: Reuters

ईस्टर विकेंडला स्विडनच्या अनेक शहरात कुराण जाळल्याच्या प्रकाराराचे पडसाद उमटले. अनेक शहरांमध्ये दंगल भडकल्याने पोलिसांना जमावाला नियंत्रित करण्यासाठी गोळीबार करावा लागला. अनेक शहरांमध्ये करण्यात आलेल्या पोलिसांच्या गोळीबारामुळे काही ठिकाणी जमावातील नागरिक जखमीही झाल्याची माहिती आहे. स्विडनच्या नॉरकॉपिंग शहरात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे. एका इस्मामविरोधी उजव्या विचारसरणीच्या समुहाने कुराणच्या प्रति जाळल्याने स्विडनच्या काही शहरात हिंसाचाराचे प्रकार झाल्याचे समोर आले.

दक्षिण स्विडनच्या भागात एका समुहाने इस्लामविरोधी रॅली काढली होती. या समुहात बहुतांश तरूणाईचा समावेश होता. या जमावाने दगडफेक करत कार फोडल्या. तसेच टायर आणि डस्टबिनला आगदेखील लावली. परिणामी अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली. पण या घटनेचा तणाव हा रविवारपर्यंत राहिला. या घटनेत अनेक लोक जमखीही झाल्याचे समोर आले आहे.

याआधी शुक्रवारी स्विडनच्या ऑरेब्रो शहरात आंदोलनकर्त्यांनी कुराण जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये १२ पोलीसही जखमी झाल्याची माहिती आहे. त्यामध्ये पोलीसांच्या कार जाळण्याचेही प्रकार समोर आले. अनेक आंदोलनकर्त्यांनी दगडफेक करत पोलिसांवरही हल्ला केला. या संपुर्ण घटनेच्या निमित्ताने एकुण २० तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनीही अशा पद्धतीच्या कोणत्याही आंदोलनासाठी परवानगी दिली नव्हती.

स्विडनच्या मालमो येथील सेंट्रल पार्कमध्ये स्ट्राम कुर्सला नेता रासमुस पालुदनने काही लोकांना उद्देशनू भाषण करताना त्यांच्याविरोधात एका दुसऱ्या जमावाने हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी पाण्याचा मारा करत जमाव पांगवला. या घटनेता पालुदनलाही दगडफेकीतला दगड लागल्याची माहिती आहे. त्याच्या पायावर दगड लागल्याची माहिती स्विडनच्या प्रसारमाध्यमांनी दिली आहे. पण या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झालेली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


 

First Published on: April 18, 2022 9:24 AM
Exit mobile version