Black Money: स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी

Black Money: स्विस बँकेकडून मिळाली भारतीयांची दुसरी यादी

भारत आणि स्वित्झर्लंडमधील काळ्या पैशाची माहिती स्वयंचलितरित्या देवाणघेवाण करण्याच्या कराराच्या अंतर्गत, भारतीय नागरिकांच्या स्विस बँक खात्यांची दुसरी यादी स्विस सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे काळ्या पैशाविरूद्धच्या लढाईत सरकारला आणखी एक मोठं यश मिळाले आहे. स्वित्झर्लंडच्या फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (एफटीए) दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडच्या मते, भारतासह ८६ देशांसोबत ३१ लाख आर्थिक खात्यांबाबत माहिती देण्यात आली आहे.यापूर्वी स्वित्झर्लंडनं सप्टेंबर २०१९ मध्ये भारतासह ७५ देशांना याबाबत माहिती दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, फेडरल टॅक्स अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने शुक्रवारी जारी केलेल्या एका वक्तव्यात भारताला AOEI अंतर्गत २०१९ मध्ये स्विस बँकेत काळा पैसा असलेल्यांची पहिली यादी मिळाली होती. यामध्ये ७५ देशांचा समावेश होता. यावर्षी देण्यात आलेल्या माहितीत तब्बल ३१ लाख खात्यांचा समावेश असल्याचे म्हटले होते. परंतु स्पष्टपणे यात भारताचे नावं नव्हते. स्वित्झर्लंडने स्विस बँकेच्या ग्राहकांच्या वित्तीय खात्यांविषयी व इतर अनेक वित्तीय संस्थांविषयी तपशील दिलेल्या प्रमुख देशांमध्ये भारताचे नाव असल्याचे सांगण्यात आले.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वित्झर्लंडकडून देण्यात आलेल्या यादीत मोठ्या प्रमाणात भारतीय संस्था आणि नागरिकांची नावं आहे. गेल्या एका वर्षात स्वित्झर्लंडमधील अधिकाऱ्यांनी १०० पेक्षा अधिक भारतीय नागरिक आणि संस्थांविषयी माहिती दिली आहे. ही प्रकरणे बहुतेक जुन्या खात्यांशी संबंधित आहेत, जी २०१८ पूर्वी बंद झालेली असू शकतात, ज्यासाठी स्वित्झर्लंडने परस्पर प्रशासकीय पाठबळाच्या पूर्वीच्या आराखडय़ात भारताला माहिती दिली आहे. दरम्यान, भारतीय अधिकाऱ्यांनी त्या खातेधारकांविरोधात कर चुकवेगिरीचे पुरावे उपलब्ध करून दिले होते. एईओआय केवळ २०१८ दरम्यान सक्रिय किंवा बंद असलेल्या खात्यांना लागू होते.


ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

First Published on: October 10, 2020 8:58 AM
Exit mobile version