कोरोनाची लक्षणे कशी ओळखाल ?

सध्या संपूर्ण जगासमोर कोरोना व्हायरसचे आव्हान उभे ठाकले आहे. साधारण सर्दी, ताप, खोकला अशी याची लक्षणं असल्याने हा आजार सुरुवातीला कोणाच्याही लक्षात येत नाही. पण जेव्हा रुग्णाची प्रकृती खालावू लागते तेव्हा कोवीड १९ झाल्याचे निष्पन्न होते. यातून अनेकजण बरेही होतात. पण काहीजणांना मात्र या आजारावर मात करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामुळे ही वेळ टाळायची असेल तर सुरुवातीपासूनच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. यासाठी त्याची लक्षणे जाणून घेऊया.

पहिला दिवस- रुग्णाला सर्दी तापाबरोबरच कोरडा खोकला लागतो. नंतर अंगदुखी व स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात.

काहीजणांना घशाला खवखवते. घशाला आतून सूज येते.

पाचवा दिवस- श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो. साधारणत वयस्क व्यक्तींमध्ये व ज्यांना इतर शारिरीक व्याधी असतील त्यांच्यात ही लक्षणे तीव्र असतात.

सातवा दिवस- रुग्णाला अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागते.

आठवा दिवस.— या कालावधीत कोरोनाचा संसर्ग फुफ्फुसा पर्यंत पसरलेला असतो. यामुळे छातीत कफ साचण्यास सुरुवात होते.

कफ वाढत असल्याने फुफ्फुसांपर्यंत ऑक्सिजन पोहचण्यास अडथळा येतो. रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा त्रास सुरू होतो. छातीत दुखू लागते.

साधारणत कोरोना झाल्याचे २ ते १० दिवसात स्पष्ट होते.

यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सुरुवातीपासूनच स्वच्छता बाळगावी. सर्दी खोकला ताप आल्यास डॉक्टरांकडे जावे. त्यांच्या सल्ल्यानुसारच वागावे.

सॅनिटायझरने हात धुवावे. WHO च्या सूचनांनुसार प्रत्येक व्यक्तीने २० सेकंदापर्यंत हात धुणे आवश्यक आहे.

First Published on: April 1, 2020 11:34 PM
Exit mobile version