भारतात कोरोना पसरवण्याचा तबलीग जमातीचा कट; वसीम रिझवींचा आरोप

भारतात कोरोना पसरवण्याचा तबलीग जमातीचा कट; वसीम रिझवींचा आरोप

शिया वक्फ बोर्डाचे प्रमुख वसीम रिझवी यांनी तबलीग जमात प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे. तबलीग जमातीवर हल्ला करत उत्तर प्रदेश मध्य शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी म्हणाले की, तबलीग जमातने प्राणघातक कोरोना विषाणू पसरवून आत्मघातकी हल्ल्याची योजना आखली होती. रिझवी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, मोदी सरकारला त्रास देण्यासाठी हा कट रचला होता आणि प्रत्यक्षात ते पंतप्रधानांविरूद्धचं षडयंत्र होतं. ते पुढे म्हणाले की, तबलीग जमातने घातक विषाणूचा प्रसार करून एक लाखाहून अधिक लोकांना मारण्याची योजना आखली होती, असा आरोप केला आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमुळे जगाची अर्थव्यवस्था कोसळणार; १९३० नंतरची सर्वात मोठी मंदी


रिझवी म्हणाले, जमाती लोक आता वैद्यकीय कर्मचार्‍यांशी गैरवर्तन करत आहेत आणि वैद्यकीय बंधू-भगिनींचे मनोधैर्य खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. जेणेकरुन त्यांनी कोरोना रूग्णांवर उपचार करणं थांबवलं पाहिजे. हे देशाविरूद्धचे षडयंत्र आहे आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी रिझवी यांनी केली आहे.

दिल्लीच्या निजामुद्दीन येथील मरकजमध्ये धार्मिक मेळाव्यात सहभागी झालेले तबलीग जमातचे बरेच सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांना क्वारंटाईन केलं आहे. मरकजमध्ये प्रमाणात होते. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

First Published on: April 10, 2020 12:12 PM
Exit mobile version