तैवानमध्ये समलिंगी विवाहावर पुन्हा बंदी!

तैवानमध्ये समलिंगी विवाहावर पुन्हा बंदी!

तैवानमध्ये समलिंगी विवाहांवर पुन्हा बंदी येणार

मे २०१७मध्ये तैवानच्या न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देणारा ऐतिहासिक निकाल दिला होता. मात्र आता तोच निकाल तैवानच्या जनतेने फिरवला आहे. अशा प्रकारच्या समलिंगी विवाहाविरोधात तैवानच्या तब्बल ६० लाख जनतेने निवडणूक आयोगाकडे आपलं मत नोंदवलं आहे. त्यामुळे तैवानमध्ये लवकरच समलिंगी विवाहांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. तैवानच्या निवडणूक आयोगाने त्यासंदर्भातला निर्णय घेतल्यानंतर ही बंदी लागू केली जाणार आहे. त्यामुळे तैवानवर त्यांनीच घेतलेल्या उदारमतवादी निर्णयाला परत फिरवण्याची नामुष्की ओढवणार आहे.

आपलाच निर्णय बदलण्याची नामुष्की!

मे २०१७मध्ये तैवानच्या न्यायालयाने समलिंगी विवाहाला मान्यता देणारा निर्णय दिला होता. तो कायद्यामध्ये रुपांतरीत करण्यासाठी दोन वर्षांची मुदत देखील देण्यात आली होती. त्यासाठी तैवानवर कौतुकाचा वर्षाव देखील झाला होता. आशियाई देशांमध्ये सर्वाधिक उदारमतवादी आणि स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारा निर्णय घेतल्याबद्दल तैवानला सर्वच स्तरातून शुभेच्छा दिल्या गेल्या. मात्र, आता तोच निर्णय बदलण्याची नामुष्की तैवानवर येणार आहे. यासंदर्भात तैवानमधल्या जनतेने अशा विवाहांविरोधात आपलं मत नोंदवलं आहे. त्यामुळे समलिंगी संबंध आणि विवाहांसाठी लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा हा मोठा पराभव मानला जात आहे.


तुम्ही हे वाचलंत का? – पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान समलिंगी, पत्नीचा आरोप

मानवी अधिकार संघटनांचा निषेध

दरम्यान, तैवानमधल्या मानवी अधिकार संघटनांनी या निकालाचा निषेध केला आहे. ‘ही संपूर्ण मतप्रक्रिया अवैध असून घटनाबाह्य आहे. मतप्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेल्या बहुतेक लोकांना चुकीची माहिती देऊन फसवण्यात आलं होतं, हेच या निकालांवरून दिसून येत आहे‘, अशी प्रतिक्रिया तैवानच्या विवाह समान हक्क संस्थेने जारी केलेल्या परिपत्रकात देण्यात आली आहे.

First Published on: November 25, 2018 7:16 PM
Exit mobile version