होशीयार!! ताज महालमधील प्रवेश फी वाढली

होशीयार!! ताज महालमधील प्रवेश फी वाढली

जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताज महाल! मुघल वास्तुकलेचं एक उत्तम उदाहरण. प्रेमाचं प्रतिक म्हणून या ताज महालची जगभरात ओळख!! देश – विदेशतील लाखो पर्यंटक ताज महालला भेट देतात. त्यातून भारत सरकारला उत्पन्न देखील चांगलंच मिळतं. यापूर्वी ताज महालमध्ये जाण्यासाठी ५० रूपये फी आकारली जात होती. पण, ५० रूपयाचं तिकीट काढल्यानंतर तुम्हाला आता ताज महालच्या मुख्य भागामध्ये प्रेवश मिळणार नाही. होय! अगदी बरोबर वाचलात. सोमवारपासून अर्थात आजपासून ताज महालचा मुख्य भाग पाहण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीय पुरातत्व विभागानं याबद्दलची माहिती दिली आहे. यापूर्वी ताज महालच्या मुख्य भागापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त पैसे आकारले जात नव्हते. पण, आता मात्र ही तिकीट ५० रूपयावरून २०० रूपये करण्यात आली आहे.

विदेश पर्यटकांसाठी हा दर १,३०० रूपये करण्यात आला आहे. सतराव्या शतकातील ही वास्तु पाहण्यासाठी विदेशातून देखील लाखो पर्यंटक ताज महालला भेट देतात. सार्कमधील पर्यटकांना आता ५४० ऐवजी ७४० रूपये मोजावे लागणार आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे ताज महालचा मुख्य भाग खचत असल्याचं निदर्शनास आलं होतं. पण, आता नवीन तिकीट दरांमुळे त्यामध्ये फरक पडेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कारण, तिकीटांचे दर वाढवल्यानं मुख्य भागामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या देखील कमी होईल अशी शक्यता आहे.

नवीन नियमानुसार जे पर्यंटक ५० रूपयाची तिकिट खरेदी करतील त्यांना ताज महालच्या मुख्य भागामध्ये प्रवेश करता येणार नाही. पण, त्यांना वास्तुचा फेरफटका मारता येणार आहे. किंवा ताजमहाल पाहता येणार आहे. १९८३ साली युनेस्कोनं ताज महालला हेरिटेज वास्तुचा दर्जा दिला आहे. शिवाय, जगातील उत्तम वास्तुकलेचा नमुना म्हणून देखील ताज महालकडे पाहलं जातं.

वाचा – ताज महालाचा इन-चार्ज कोण?

वाचा – …अन्यथा ताजमहाल उद्ध्वस्त करा – सर्वोच्च न्यायालय

First Published on: December 10, 2018 12:30 PM
Exit mobile version