१८८ दिवसांनंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला, पहिला प्रवेश केला चीनच्या पर्यटकाने

१८८ दिवसांनंतर ताजमहाल पर्यटकांसाठी खुला, पहिला प्रवेश केला चीनच्या पर्यटकाने

ताजमहाल हे सात आश्चर्यांपैकी एक आहे. जगातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळ ताजमहाल अनलॉक-४च्या नियमानुसार तब्बल १८८ दिवसानंतर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असणार आहे. हाताच्या बोटावर मोजण्या इतपत पर्यटक पहिल्यादिवशी ताजमहाल पाहण्यासाठी आले होते. कोरोनाचा काळ असल्यामुळे ताजमहाल पाहण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. ताजमहाल पर्यटकांसाठी खुला होताच एका चीन पर्यटकाने पहिला प्रवेश केला.

यावेळी ताजमहालची तिकीट खिडकी बंद असून ऑनलाईन तिकीट काढण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता फक्त ताजमहाल समाधी कक्षात जाण्यासाठी ५ पर्यटकांना परवानगी देण्यात आली आहे. ऑनलाईन पेमेंटद्वारे पार्किंग तिकीट आणि इतर तिकीट घेता येणार आहेत.

१६५३ साली बांधलेले ५६१ फूट उंच ताजमहाल इतक्या कालावधीसाठी कधीच बंद नव्हता. पण आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत ताजमहाल पहिल्यांदा बंद ठेवण्यात आला. ताजमहाल खुला झाल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरससोबत जगण्यास लोक शिकले आहेत. ताजमहालमध्ये प्रवेश करताना मास्क घालणे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पाळण करणे अनिवार्य आहे. शू कव्हर, टिश्यू पेपरसह, रिकामी बाटली कचऱ्याच्या डब्यात टाकणे अनिवार्य आहे. तसेच यावेळी फोटोग्राफीवर बंदी घातली आहे. ताजमहालचे परवानाधारक फोटोग्राफरना वेगवेगळ्या गटात विभागले गेले आहे.

दरम्यान तब्बल १८८ दिवसांनंतर ताजमहाल खुला झाल्यानंतर पहिला पर्यटक चीनचा होता. एएसआयचे अधीक्षण पुरातत्वशास्त्रज्ञ बसंत कुमार स्वर्णकार यांनी सांगितले की, ‘ताजमहालमध्ये १ दिवसाला ५ हजार पर्यंटकांना प्रवेश दिला जाईल. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेतली जात आहे. ग्रुप फोटोग्राफी आणि ताजमहालच्या रेलिंग, भिंतींना स्पर्श करण्यास मनाई आहे. ताजमहालमधल्या प्रत्येक जागा वेळोवेळी स्वच्छ केल्या जात आहेत.’


हेही वाचा – दोन हजाराच्या नोटांची छपाई होणार बंद ?


 

First Published on: September 21, 2020 4:31 PM
Exit mobile version