Afganistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान राज; आज होणार सरकार स्थापनेची घोषणा!

Afganistan Crisis: अफगाणिस्तानात तालिबान राज; आज होणार सरकार स्थापनेची घोषणा!

अफगाणिस्तानात १५ ऑगस्ट रोजी तालिबानने कब्जा केल्यानंतर तालिबानने तेथे ताबा मिळवला. त्यानंतर अमेरिकन सैन्याच्या तेथून माघार घेतली. अमेरिकन सैन्य गेल्यानंतर येथे नवीन तालिबान सरकार स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज म्हणजेच शुक्रवारी तालिबान येथे नव्या सरकारची घोषणा करू शकते. दुपारचा नमाज अदा केल्यानंतर नवीन प्रशासनाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, तालिबानच्या दोन सूत्रांनी एएफपीला असे सांगितले की, अमेरिकेने आपले सैन्य पूर्णपणे मागे घेतले आणि इस्लामवाद्यांशी दोन दशकांचे युद्ध संपवल्यानंतर काही दिवसांनी विद्रोही गटाकडून सत्ता बदलली.

संयुक्त राष्ट्र संघाने म्हटले की, तालिबान्यांनी पाकिस्तानच्या राजधानी इस्लामाबादला उत्तर अफगाणिस्तानातील मजार-ए-शरीफ आणि दक्षिणेतील कंधार या देशांशी जोडणारी उड्डाणे पुन्हा सुरू केली आहेत. तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने अफगाणिस्तानमधील आपला दूतावास आणि संबंध आणि मानवी मदत मजबूत करण्याचे आश्वासन दिले आहे. असे मानले जाते की, तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबतुल्ला अखुंदजादा सरकारचा प्रमुख असणार असल्याचे ट्विट तालिबानच्या प्रवक्त्याने शुक्रवारी पहाटे केले.मिळालेल्या माहितीनुसार, नवीन राज्यकर्त्यांनी १९९६ ते २००१ यादरम्यान, अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांच्या सत्तेच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा अधिक सामावून घेण्याचे वचन दिले आहे. इस्लामी कायद्याच्या क्रूर आणि हिंसक व्याख्येसाठी ती पहिली राजवट धोकादायक होती. त्यावेळी, स्त्रियांबद्दल त्यांचे वर्तन खूप वाईट होते. महिलांना शाळेत आणि कामावर जाण्यास बंदी घालण्यात आली आणि त्यांचे स्वातंत्र्य नाकारण्यात आले होते.

या आठवड्याच्या सुरुवातीला अफगाणिस्तानमध्ये मानवी आपत्तीचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला. इटलीचे परराष्ट्र मंत्री शुक्रवारपासून उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कतार आणि पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना अफगाणिस्तान नागरिकांना मदत करणार होते, तर त्यांचे ब्रिटिश समकक्ष पुढील आठवड्यात या भागाला भेट देणार होते. दरम्यान, कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गुरुवारी सांगितले की, आखाती राज्य तालिबानसोबत काबूलचे विमानतळ लवकरात लवकर उघडण्यासाठी काम करत आहे.


First Published on: September 3, 2021 9:28 AM
Exit mobile version