Assembly Election 2021: तमिळनाडूत वर्षाला ६ सिलेंडर फ्री, एकाला सरकारी नोकरी तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ

Assembly Election 2021: तमिळनाडूत वर्षाला ६ सिलेंडर फ्री, एकाला सरकारी नोकरी तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक कर्ज माफ

येत्या काही दिवसांत तामिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम या चार राज्यांसह पद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या आगामी निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यातील उमेदवारांच्या नावांच्या घोषणेसह त्या-त्या राज्यातील पक्ष आपले जाहीरनामे प्रसिद्ध करण्याच्या तयारीला लागले आहे. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता जोर धरू लागला आहे. यादरम्यान, तामिळनाडूत सध्या सत्तेत असलेल्या अण्णाद्रमुक (All India Anna Dravida Munnetra Kazhagam) पक्षानेही आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करताना आश्वासनांना वर्षाव केल्याचे दिसले. अण्णाद्रमुकने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेक आश्वासने मतदारांना दिली आहेत. यामध्ये प्रत्येक कुटुंबाला एका वर्षात ६ सिलेंडर विनामुल्य देणार असून वृद्धांसह जेष्ठ मंडळींना देण्यात येणारी वृद्धांची पेन्शन दुप्पट करण्याबरोबरच मातृत्व रजेतही वाढ करणार असल्याचे आश्वासनं तामिळनाडूमध्ये असणाऱ्या विरोधी पक्ष अण्णाद्रमुकने दिले आहेत.

असा आहे तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्षाचा जाहीरनामा

तमिळनाडू राज्यात विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार २३४ जागांसाठी ही आगामी निवडणूक पार पडणार आहे. यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १९ मार्च तर हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख २२ मार्च आहे. या राज्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.

भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी रविवारी १४ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन तामिळनाडूतील पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि इतर वरिष्ठ सदस्यांच्या उपस्थित तामिळनाडूमध्ये भाजप २० विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती दिली. या माहितीनुसार, तामिळनाडूतील भाजपचे अध्यक्ष एल मुरूगन धारापुरम आणि एच. राजा कराईकुडीमधून निवडणूक लढणार आहेत. तर कोयंबत्तूर दक्षिणमधून वनाथी आणि अभिनेत्री खुशबू सुंदर थाऊजंड लाईट्समधून निवडणूक लढणार आहे.

First Published on: March 15, 2021 2:43 PM
Exit mobile version