एकीकडे हल्ले, तर दुसरीकडे माणुसकी; पोलिसाने शिवले ३ हजार मास्क!

एकीकडे हल्ले, तर दुसरीकडे माणुसकी; पोलिसाने शिवले ३ हजार मास्क!

police telanga

कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर झाला आहे. त्यामुळे देशात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद आहेत. घरातून बाहेर पडू नका असे आवाहन वेळोवेळी मुख्यमंत्री, पंतप्रधान यांच्याकडून केले जात आहेत. पण तरीही लोक बाहेर फिरताना दिसतात. पण उलट बाहेर फिरणारे उनाड लोकांनीच पोलिसांना मारल्याच्या घटना घडल्या आहेत. पंजाबमध्ये तर एका माथेफिरूंनी पोलिसांचा हात कापला. पण हे २४ तास ऑनड्युटी असणारे पोलिस यांनी अनेकवेळा कोरोना काळात सामाजिक कार्यात हात पुढे केल्याच्याही घटना पुढे आल्या आहेत.

अशीच एक घटना समोर आली आहे. तेलंगणामधील वैयक्तिक सुरक्षा अधिकारी तमीळीसाई सुंदराजन यांनी स्वखर्चाने ३ हजार मास्क स्वत: तयार केले आणि ज्यांना मास्कची गरज होती अशा लोकांना त्यांनी ते मास्क वाटले.

या विषयी बोलताना ते म्हणाले, लॉकाडऊन जाहीर झाल्यापासून मी मास्क शिवायला सुरूवात केली. कारण बाजारात मास्कचा तुटवडा आहे ही बातमी सारखी येत होती. त्यामुळे तेलगंणा सराकराची परवानगी घेऊन मी मास्क बनवायला सुरूवात केली. अशी माहिती २९ वर्षीय अमरेश्वरी, सुरक्षा रक्षक यांनी एनआयशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या या कोरोनाच्या काळात मास्कची जास्त गरज आहे. जास्त करून गरजू लोकांना हे मास्क पोहचावेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. कारण आता अचानक बाजारातली मास्कची मागणी वाढली आहे. त्यामुळे हे तयार झालेले ३ हजार मास्क आम्ही दारो दारी जाऊन वाटणार आहोत. ५ हजार मास्क बनवणं हे माझं टार्गेट आहे. त्यामुळे ते पुर्ण होईपर्यंत मी मास्क बनवतच राहणार आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ६९८ कोरोना पॉझिटिव्ह लोकं तेलंगणामध्ये आहेत. त्यातील १२० जाणं बरी होऊन आपल्या घरी परतली आहेत. तर १८ जाणांचा मृत्यू झाला आहे.

First Published on: April 17, 2020 7:04 PM
Exit mobile version