तेलुगू अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

तेलुगू अभिनेता सुधीर वर्माची आत्महत्या

तेलुगू चित्रपटातील अभिनेता सुधीर वर्माने त्याच्या विशाखापट्टनम येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या सहकलाकाराने या घटनेला दुजोरा दिला आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

३३ वर्षीय वर्माने २०१३ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. स्वामी रा रा हा त्याचा पहिला चित्रपट. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या कुंडानापू बोम्मा चित्रपटाने सुधीरला ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्याने अनेक चित्रपटात काम केले. गेले काही दिवस त्याला काम मिळत नव्हते अशी चर्चा होती. मात्र त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. सुधीरच्या आत्महत्येने तेलुगू चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.

कलाकार नैराश्येतू आत्महत्या करत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षात वाढल्या आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने तर बॉलीवूड हादरून गेले होते. टीव्ही कलाकार तुनिषा शर्माच्या शर्माच्या आत्महत्येने तर सर्वांनाच धक्का बसला. गेल्या वर्षी चित्रिकरणाच्या सेटवरच तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेच्या कामण येथील एका स्टुडिओमध्ये तिने गळफास घेतला. तुनिषा सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबुल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला रुग्णालयात नेलं होतं, परंतू त्याठिकाणी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मुंबई पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, प्रियकर शीजानमुळे तुनिषाने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे. शीजान खान इतर अनेक मुलींसोबत चॅट करायचा. त्याच्या फोनच्या तपासणी दरम्यान अनेक पुरावे मिळाले आहेत. ज्यातून स्पष्ट होतय की, तुनिषासोबत ब्रेकअप केल्यानंतर आरोपी शीजान खान तिच्याशी फार बोलत नव्हता. तुनिषा त्याला सतत मॅसेज करायची, परंतु तो तिचे मॅसेज बघत नव्हता. तुनिषाच्या आईने पत्रकार परिषदे मध्ये सांगितले होते की, 24 डिसेंबरला शीजानने तुनिषाला मालिकेच्या सेटवर कानाखाली मारली होती. तिनेही प्रेम भंगाच्या नैराश्येतून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी शीजानला अटक झाली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.

First Published on: January 23, 2023 11:09 PM
Exit mobile version