गुजरातमध्ये पुजाऱ्याचे मंदिरातच महिलेवर अत्याचार

गुजरातमध्ये पुजाऱ्याचे मंदिरातच महिलेवर अत्याचार

प्रातिनिधिक फोटो

गुजरातमधील प्राची येथील सुप्रसिद्ध माधवराय जी मंदिराच्या मुख्य पुजाऱ्यावर बलात्काराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषिगिरी गोस्वामी असे या पुजाऱ्याचे नाव आहे. पीडित महिलेने २३ मे रोजी वीरावल झोनच्या सहाय्यक अधीक्षकाकडे तक्रार दाखल केली आहे. पुजाऱ्याने गेल्या दीड वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याचा तसेच आपल्याला इजा पोहोचवल्याचा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे. या तक्रारीवरून पुजाऱ्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

नेमके काय घडले

तलाला तालुक्यातील अंकोलवाडी गावात राहणाऱ्या या महिलेचे ६ वर्षांपूर्वी प्राचीतील एका व्यक्तीसोबत लग्न झाले होते. लग्नानंतर दोघेही माधवराय जी मंदिरास दर्शनासाठी जात असे. यादरम्यान गोस्वामी पुजारी पीडितेच्या संपर्कात आला. ऑगस्ट २०१६ ला पुजाऱ्याने सेवाकार्यासाठी मंदिरात बोलावल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. पुजाऱ्याने आपल्याशी प्रेमाचे नाटक केले, लग्नाचे वचन दिले आणि शरीर संबंधाची मागणी केली. याला नकार दिल्यानंतर पुजाऱ्याने बळजबरी केली, असे महिलेने सांगितले. आश्चर्याची बाब म्हणजे हा सर्व गैरप्रकार मंदिरावर असलेल्या पुजाऱ्याच्या खोलीतच सुरू होता.

First Published on: May 30, 2018 10:37 AM
Exit mobile version