दहशतवादी संघटना अल कायदाची दिल्ली, महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी

दहशतवादी संघटना अल कायदाची दिल्ली, महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये आत्मघाती हल्ल्याची धमकी

पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ( offensive remarks about the Prophet Mohammad) केल्याप्रकरणी आखाती देशांतून निदर्शने सुरू झाल्यानंतर भाजपने (bjp) आपले दोन प्रवक्ते नुपूर शर्मा आणि नवीन कुमार यांच्यावर कारवाई करून कठोर संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपने नेत्यांची यादी तयार केली आणि त्यांना वादग्रस्त विधानांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या. तर आता दुसरीकडे दहशतवादी संघटना अल कायदानेही याप्रकरणी भारताला धमकी दिली आहे (terrorist group Al Qaeda threatened to attack India). अल कायदाने दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ल्याची (suicide bombings) धमकी देणारे दोन पानी पत्र जारी केले आहे.

५७ मुस्लीम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनने (ओआयसी) प्रथम या मुद्द्यावर विरोध केला. त्यानंतर काही अरब देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. यासोबतच इराण, इराक, कुवेत, कतार, सौदी अरेबिया, ओमान, यूएई, जॉर्डन, अफगाणिस्तान, बहरीन, मालदीव, लिबिया, इंडोनेशिया, तुर्की, मलेशिया आणि पाकिस्तान या देशांनीही या वक्तव्याला विरोध केला आहे.

आता दहशतवादी संघटना अल कायदाने भारतात आत्मघाती हल्ल्याची धमकी दिली आहे. अल कायदाने आपल्या धमकीच्या संदेशात म्हटले आहे की, गुजरात आणि मुंबई आणि यूपीसह अनेक राज्ये आपली लक्ष्य आहेत. त्यांनी त्यांच्या मीडिया चॅनेलद्वारे दोन पानी निवेदन जारी करून दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघातकी हल्ल्याची धमकी दिली.

पैगंबर मोहम्मद यांच्यावर भाजप नेत्याने केलेल्या वक्तव्यानंतर आखाती देशांमध्ये खळबळ उडाली आहे. भाजपने आपल्या नेत्याला निलंबित केले असले तरी प्रकरण शांत झालेले नाही.

First Published on: June 7, 2022 10:12 PM
Exit mobile version