Terror Attack Threat : 26/11 सारखे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा अटकेत; गुजरात पोलिसांची कारवाई

Terror Attack Threat : 26/11 सारखे बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा अटकेत; गुजरात पोलिसांची कारवाई

'या' व्यक्तींनी अनुभवली २६/११ची काळ रात्र

मुंबईत 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची आजही आठवण झाल्यास अंगावर शहारे उटतात. कारण या हल्ल्यात पोलिसांसह 166 पेक्षाही जास्त जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, आता या घटनेची चर्चा होण्याचे कारणं म्हणजे अशाच पद्धतीचा म्हणजे 26/11 सारखा दहशतवादी हल्ला करण्याचा धमकी देणार ई-मेल गुजरातमधील सरकारी संस्थांना आला. मुंबईतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आलेल्या धमकीच्या ई-मेलचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला असता पोलिसांना मोठं यश आलं. कारण पोलिसांनी मेल पाठवणाऱ्या आरोपीच्याच मुसक्या आवळव्या आहेत. (terrorist threat attack like mumbai 26 11 in the country one person arrested by gujarat ats)

जावेद अंसारी असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी ओडिशामधून अटक केली आहे. जावेद अंसारीने केलेल्या ई-मेलच्या शोधासाठी गुजरात एटीएसने शर्तीचे प्रयत्न केले. त्या ई-मेलनंतर तांत्रिक विश्लेषणाच्या साह्याने तपास सुरु करण्यात आला. अधिक तपासासाठी गुजरात एटीएस ओडिशामध्ये पोहचले. त्यावेळी गुजरात एटीएसने जावेद अंसारी याला अटक केली. जावेद याने धमकी देणाऱ्या ई-मेलमध्ये 26/11 सारखे स्फोट घडवून आणण्याचा दावा केला होता.

ई-मेलद्वारे धमकी देणारा आरोपी जावेद याला अटक केल्यानंतर एटीएसकडून त्याची अधिक चौकशी करण्यात आली. त्यावेळी जावेद याच्यासोबत आणखी कोणी आहे का? याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, गतवर्षी दोन दहशतवाद्यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या दोन दहशतवाद्यांच्या चौकशीत बॉम्बस्फोटात बदल धक्कादायक माहिती उघड झाली. NIA कडून याप्रकरणी आणखी चार दहशतवाद्यांच्या विरोधात मुंबई विशेष न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.

26/11 मुंबईवरील दहशतवादी हल्ला

26 नोव्हेंबर 2008 हा दिवस मुंबईकरांसाठी काळा दिवस ठरला. कराचीहून समुद्रामार्गे आलेल्या काही दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं, अंधाधुंद गोळीबार केला आणि त्यामध्ये अनेक निष्पाप जिवांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यामध्ये मुंबई पोलिसांचे काही धाडसी अधिकारी शहीद झाले.


हेही वाचा – UDDHAV THACKERAY : ठाकरेंनी रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले नाही; कार्यकर्ते शिंदे गटात दाखल

First Published on: March 15, 2024 8:47 AM
Exit mobile version