Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सरपंचावर अंदाधुंद गोळीबार

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सरपंचावर अंदाधुंद गोळीबार

टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यातील तरुणाला एटीएसकडून अटक; अतिरेक्यांना पाठवले 10 हजार रुपये

Jammu Kashir : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे हल्ले सुरू आहेत.  ANI ने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील ऑडोरा गावात दहशतावाद्यांनी एका सरपंचावर गोळीबार केला. या गोळीबारात सरपंचाचा मृत्यू झाला.  शब्बीर अमदम असे त्या सरपंचांचे नाव असून ते ऑडोरा गावाचे रहिवासी होते. अशाप्रकारे भ्याड हल्ला करणाऱ्या त्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून नाकेबंदी केली आहे.

टीव्ही ९ हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार, या हल्ल्याची जबाबदारी TRF या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. प्रतिबंधित लष्कर ए तोयबाशी संबंध असलेल्या या संघटनेने जम्मू काश्मीरच्या राजधानीत झालेल्या हल्ल्याची जबाबदारी देखील स्वीकारली होती.

जम्मू काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेल्या सरपंचाला सुरक्षा देण्यात आली होती. श्रीनगरमधील एका हॉटेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. परंतु बुधवारी शहराच्या बाहेरील खानमोहमध्ये दहशतवाद्यांनी सरपंचावर हल्ला केला. अंदाधुंद गोळीबारानंतर सरपंचांना रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र रुग्णालयात नेताच त्यांना मृत घोषित करण्यात आले.

गुरुवारीच जम्मू काश्मीरच्या पुलवामा येथे लष्कर ए तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू गोळा आणि हत्यारे जप्त करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पुलवामाच्या नैना बातपोरा क्षेत्रातही दोन आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ शोध मोहिम सुरू करण्यात आली होती.

गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये सातत्याने हल्ले होत आहेत. अनेक भागांमध्ये सैनिक सर्च ऑपरेशन करत आहेत.

First Published on: March 11, 2022 10:13 PM
Exit mobile version