दहशतवादी पाताळात लपले तरी त्यांना शोधून मारू – मोदी

दहशतवादी पाताळात लपले तरी त्यांना शोधून मारू – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात राज्याच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात देशभरातून नारेबाजी होत आहेत. दरम्यान गुजरात येथील सभे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील दहशतवाद विरोधात भाषण केले आहे. दहशतवादी पाताळात लपले तरी त्यांना शोधून मारू असे वक्तव्य त्यांनी केले आहे. भारत-पाकिस्तानदरम्यान तणावाच्या परिस्थितीमुळे देशाचे राजकारण तापले आहे. भारतातवर होणाऱ्या हल्ल्यानंतर आता दहशतवाद खपवला जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी गांधीनगर येथे विविध प्रकल्पांची सुरुवात केली. यानंतर एका सभेला संबोधित करताना त्यांनी असे म्हटले.

काय म्हणाले मोदी

“भारत गेल्या ४० वर्षांपासून दहशतवादाचे दुखणे झेलत आहे. मात्र आता दहशतवादाला सहन केले जाणार नाही. जर कुणी दहशतवाद्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केले तर अशांना घरात घुसून मारणार. एकेका दहशतवाद्याला वेचून मारणे आमचे धोरण आहे. दहशतवाद्यांना त्यांच्या घरात शिरून मारणे हा आमचा सिद्धांत आहे. दहशतवादी सातव्या पाताळात लपूरन बसले तरी आम्ही त्यांना सोडणार नाही.” – पंतप्रधान, नरेंद्र मोदी

First Published on: March 4, 2019 10:06 PM
Exit mobile version