कोरोना योद्ध्यांच्या विमा कवच योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

कोरोना योद्ध्यांच्या विमा कवच योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Coronavirus India Update: देशातील कोरोना बधितांच्या आकड्यात आज पुन्हा घट, तर कोरोनाबळींचा आकडा ८५३ वर

कोरोना योद्धे म्हणून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या ५० लाख रुपयांच्या विमा कवच योजनेस ३० जूनपर्यंत  मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या योजनेस पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना विरोधातील युध्दात पोलीस, वैद्यकीय, आरोग्य  कर्मचारी उतरले आहेत. सरकारी कर्मचा-याचा कोरोनामुळे मृत्यु झाल्यास ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने गेल्या वर्षी घेतला होता. ही योजना ३० सप्टेंबरपर्यंत लागू होती. पण राज्यातील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन या योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्याच्या वित्त विभागाने घेतला आहे.

ही योजना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था  आणि  सार्वजनिक उपक्रमांनाही लागू आहे. त्यात पोलिस, आरोग्य कर्मचारी, जिल्हा प्रशासन कर्मचारी, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा आणि कोषागरे, अन्न आणि नागरी पुरवठा, पाणी पुरवठा, स्वच्छता विभाग, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले  तसेच अन्य विभागांचे कर्मचारी, कंत्राटी कामगार, आऊटसोर्स केलेले कामागार, रोजंदारी आणि स्वयंसेवी संस्थाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.


 

First Published on: May 14, 2021 8:05 PM
Exit mobile version