मोदी भक्त असल्यामुळे ‘त्याचे’ लग्न मोडले!

मोदी भक्त असल्यामुळे ‘त्याचे’ लग्न मोडले!

पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदींवरून झालेल्या वादात लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. कानपूरच्या एका उद्योगपतीच्या मुलाचे लग्न सरकारी शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षिकेशी ठरल होतं. लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना मुलीने स्वतःच ठरलेलं लग्न मोडलं असल्याचे समजते.

लग्नाची बोलणी करण्यासाठी मुलगा आणि मुलगी कुटुंबियांसमवेत जमले होते. लग्नाच्या विषयावर चर्चा सुरु असतानाच देशातील अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलू लागले. याच मुद्द्यांवरून मुलगा आणि मुलीमध्ये वाद झाला. नवरा मुलगा हा मोदी भक्त होता. तो मोदी सरकारचे कौतुक करत होता. पण मुलीला हे मान्य नव्हते. ती तिच्या मतांवर ठाम होती. मुलीने मुलाला खोट ठरवत मोदींनी किती चुकीचे निर्णय देशासाठी घेतले, याची सविस्तर माहिती दिली. ज्यामुळे मोदी समर्थक मुलगा चिडला. त्या दोघांमधील वाद विकोपाला गेले. या दरम्यान, दोन्ही कुटुंबातील लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघही आपापल्या मुद्द्यांवर ठाम होते.

अखेर मुलीने मोदी भक्त मुलाशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी मी माझे विचार बदलू शकत नाही, असं त्या मुलीने जाता जाता त्या मुलाला सांगितले.

First Published on: December 22, 2018 1:07 PM
Exit mobile version