भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर

भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर

भारतात आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित महिलेला पुन्हा कोरोनाचा संसर्ग, प्रकृती स्थिर

भारतात सापडलेल्या पहिल्या कोरोना रुग्णाला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. भारतात ३० जानेवारी २०२० रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. केरळमधील मेडिकल स्टुडंट असलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला होता. केरळ आरोग्य विभागाकडून या महिलेला पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या महिलेनं कोरोना आरटीपीसीआर चाचणी केली होती या चाचणीचा अहवाल सकारात्मक आला असल्याने महिलेला होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याबाबतची माहिती केरळ आरोग्य विभागाने दिली आहे.

भारतातील पहिला कोरोना रुग्ण म्हणून सापडलेली महिला मेडिकल स्टुडंट आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी दिल्लीला जाण्यासाठी पुन्हा कोरोना आरटीपीसीआर चाचणी केली होती. ही चाचणी सकारात्मक आली आहे. महिलेला पुन्हा कोरोनाची लागण झाल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. मागील वर्षी ही महिला चीनमधून भारतात परतली होती. चीनच्या वुहान लॅबमध्ये ही महिला काम करत होती भारतात आल्यावर तिला कोरोना संसर्ग झाला असल्याचं समजलं यानंतर तब्बल १७ महिन्यांच्या कालावधीनंतर महिलेला पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे.

दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मेडिकल स्टुडंटला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. सध्या कोरोनाबाधित असलेल्या या रुग्णाला कोणतीही लक्षणं आढळली नाहीत. यामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. मागील वर्षी भारतात परतल्यानंतर ३० जानेवारी २०२० रोजी केलेल्या चाचणीमध्ये कोरोना संसर्ग झाला असल्याचे आढळलं होते. यामुळे ही महिला भारतातील पहिली कोरोना केस आहे. तिच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी सध्या कोणतीही लक्षणे दिसत नसल्याचे सांगितले आहे. केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे देशात सर्वात अधिक रुग्ण हे केरळमध्ये सापडत आहेत. सोमवारी केरळमध्ये १२२२० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

First Published on: July 13, 2021 7:01 PM
Exit mobile version