LockDown : तेलंगणात अडकलेल्या कामगारांची पहिली ट्रेन धावली!

LockDown : तेलंगणात अडकलेल्या कामगारांची पहिली ट्रेन धावली!

३ मे रोजी दुसऱ्यांदा घोषित केलेला लॉकडाऊन संपण्याच्या आधीच देशात पहिली रेल्वे धावल्याची माहिती समोर आली आहे. हैदराबाद (लिंगमपल्ली) ते झारखंड (हटिया) या मार्गावर ही विशेष रेल्वे चालविण्यात आली. तेलंगणा सरकारच्या विनंतीनंतर रेल्वे विभागाकडून सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून ही विशेष रेल्वे चालविण्यात आल्याचे समजते.

महाराष्ट्रातही लॉकडाऊनमुळे परराज्यातील अनेक मजूर आणि स्थलांतरित कामगार अडकून पडले आहेत. हे सर्वजण आपापल्या गावी जाण्याची मागणी करत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी थोड्या दिवसांसाठी तरी रेल्वे सुरू करावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात आज पहाटे साडे चारच्या सुमारास पहिली ट्रेन धावली. या ट्रेनमध्ये जवळपास १२०० मजूर होते. या मजुरांना घेऊन ही ट्रेन धावली आहे. या ट्रेनमध्ये सर्व सोशल डिस्टन्सिंगचे पाळण्यात आले.

कोकणात चाकरमान्यांना येवू द्या

मे महिना सुरू झाला आहे. शाळेतील मुलांना उन्हाळी सुट्टीही पडली आहे. त्यामुळे लहान मुलांना कोकणात जाण्याची ओढ लागली आहे. पण लॉकडाऊनमुळे कुठेही जाणे आता शक्य नाही. चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करा, अशीही मागणी केली जात आहे.

First Published on: May 1, 2020 4:54 PM
Exit mobile version