एकाच रुग्णामध्ये आढळली काळ्या बुरशीसह हिरवी बुरशी, जाणून घ्या कारण

एकाच रुग्णामध्ये आढळली काळ्या बुरशीसह हिरवी बुरशी, जाणून घ्या कारण

कोरोना वायरसच्या प्रादुर्भावानंतर आता नवे नवे आजार समोर येताना दिसत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेचा प्रभाव अधिक तीव्र होता. दुसऱ्या लाटेमध्ये म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची नोंद होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने कोरोनावर मात केलेलेल्या रुग्णांमध्ये अधिक प्रमाण म्युकर मायकोसिसचे असल्याचे अहवालावरुन समोर आले आहे. परंतु बंगळूरुच्या एका रुग्णामध्ये काळ्या बुरशीसह आता हिरव्या बुरशीची लागण झाल्याचे आढळले आहे. कोरोना काही कालावधीनंतर आपला प्रकार बदलत असल्यामुळे नव्या रोगाची लागण झाल्याची प्रकरण समोर येत आहे. काळ्या बुरशीची लागण झाल्याचे रुग्ण देशात आढळत असताना आता एकाच रुग्णाला काळ्या आणि हिरव्या बुरशीची लागण झाली असल्याचे आढळल्याचे एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे.

बंगळुरुमधील कोरोनावर मात केलेल्या डॉक्टर कार्तिकेयन यांनी महिन्याभरापुर्वीच कोरोनावर मात केली आहे. परंतु कोरोनावर मात केल्यानंतर त्यांना चेहरा जड वाटण, नाकपुड्या बंद होण, डोक दुखणे अशी लक्षणे जाणवत होते. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बंगळुरुत असलेल्या बीजीएस ग्लेनीग्लस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉ.प्रशांत रेड्डी यांनी उपचार सुरु केला. उपचार करताना अहवालातून रुग्णाला काळ्या आणि हिरव्या बुरशीची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कार्तिकेयन यांना म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याची लक्षणे आढळली होती. त्यांचे सर्व चाचण्या करण्यात आल्या तसेच नाकावाटे एंडोस्कोपिक सर्जरी करण्यात आली. या सर्जरीमध्ये कार्तिकेयन यांच्या सायनसमध्ये बुरशीजन्य आढळले परंतु काळ्या बुरशीपेक्षा ही बुरशी वेगळी असल्याचे आढळले. वेगळ्या प्रकारची बुरशी आढळल्याने डॉक्टरांनी नमुने तपासण्यासाठी पाठवले होते. या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर कार्तिकेयन यांना काळी आणि हिरवी बुरशी असल्याचे आढळले आहे. कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानंतर मृत पेशी शरीरात राहिल्यामुळेच म्युकरमायकोसिस आणि बुरशीचे प्रकार आढळत असल्याचे मत डॉक्टर रेड्डी यांनी व्यक्त केलं आहे.

First Published on: June 28, 2021 11:24 PM
Exit mobile version