निर्भयाच्या बलात्काऱ्यांचे वकील लढवणार हाथरस प्रकरणातील आरोपींची बाजू

निर्भयाच्या बलात्काऱ्यांचे वकील लढवणार हाथरस प्रकरणातील आरोपींची बाजू

हाथरस येथे घडलेल्या पाशवी अत्याचाराच्या निषेधार्थ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार विरोधात आज घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पीडितेला श्रद्धांजली अर्पण केली. (फोटो - दीपक साळवी)

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दलित युवतीच्या सामूहिक बलात्कार आणि मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीमार्फत करण्याबाबतच्या याचिकेवर उद्या, मंगळवारी सुप्रीम कोर्ट सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही. रामासुब्रमण्यम यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा एसआयटीमार्फत केला जावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. दरम्यान, हाथरस प्रकरणातील आरोपींची बाजू निर्भया प्रकरणी बलात्काऱ्यांचे वकील राहिलेले ए. पी. सिंह मांडणार आहे.

कोण आहेत वकील ए. पी. सिंह 

१६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत झालेल्या तरुणीच्या सामुहिक बलात्कार आणि मृत्यूप्रकरणाने संपूर्ण देशच नव्हे तर जगाला हादरून टाकले होते. त्यावेळी निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी देशातील जनता रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी कोर्टात आरोपींची बाजू लढवणारे वकील ए. पी. सिंह आता हाथरस प्रकरणातील आरोपींच्या बाजूने केस लढवणार असल्याचे वृत्त आज तकने दिले आहे. अखिल भारतीय क्षत्रिय महासभा यांच्यावतीने आपोरींचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री राजा मानवेंद्र सिंह यांनी ए. पी. सिंह यांना हाथरसप्रकरणी केस लढण्यास सांगिलते असल्याचे समजते. मानवेंद्र सिंह यांनी जारी केलेल्या पत्रकात अखिल भारतीय क्षत्रिय महासभा देणगी गोळा करून ए. पी. सिंह यांची फी देणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा –

जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ; अनंत करमुसे मारहाण प्रकरणी तीन पोलिसांना अटक

First Published on: October 5, 2020 10:47 PM
Exit mobile version