Breaking : नौशेरामधील आयईडीच्या स्फोटात एक अधिकारी शहीद

Breaking : नौशेरामधील आयईडीच्या स्फोटात एक अधिकारी शहीद

नौशेरा (सौजन्य-डेक्कन कोरियन)

जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा भीषण स्फोट झाला असून यामध्ये लष्कराचा एक अधिकारी शहीद झाल्याची माहिती समोर येत आहे. एलओसीवर तपासणी करण्याच्यावेळी हा स्फोट झाला. राजोरी-एलोसीजवळ आयईडी निकामी करताना हा स्फोट झाला. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं या घटनेमुळे दिसून येत आहे. या स्फोटामध्ये एक अधिकारी शहीद झाले असून एक जवानदेखील जखमी झाल्याचे समजते. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर आयईडी ठेवला होता. आयईडी नियंत्रण रेषेपासून १.५ किमी अंतरावर पेरण्यात आलं होतं. तो निकामी करत असताना स्फोट होऊन मेजर पदावरील अधिकारी शहीद झाला.

 

First Published on: February 16, 2019 5:56 PM
Exit mobile version