देशातील ६ राज्यांत १०० हून अधिक ठिकाणी NIAचे छापे

देशातील ६ राज्यांत १०० हून अधिक ठिकाणी NIAचे छापे

मुंबई | राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशातील सहा राज्यांमध्ये १०० हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यात एनआयएच्या टीमने हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मध्य प्रदेश या सहा राज्यात धाडी टाकल्या आहेत. शिख फॉर जस्टिस ( Sikhs for Justice) या फुटीरतावादी संघटनेचा सदस्या जसविंदर सिंग यांच्या मुलतानीच साथीदार असलेल्या परिसरात एनआयएकडून झडती घेण्यात आली. तसेच देशातील दहशतवादी (Terrorists), गँगस्टर आणि अमली पदार्थांची तस्करीला आळा घालण्यासाठी एनआयएकडून छापे टाकले जात आहे.

लॉरेन्स बिश्नोईसारख्या टोळीती सदस्यांना आणि अनेक राज्यांमध्ये पसरलेल्या त्यांच्या सिंडिकेटला तोडण्यासाठी एनआयएकडून छापा टाकण्यात आल्याचे समजते. यापूर्वी एनआयएने टाकलेल्या छाप्यात ७० हून अधिक मोबाईल जप्त केले होते. यात मोबाईलमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि ड्रग नेक्सस यांच्या टोळींशी संबंधित लोकांची माहिती समोर आली आहे.

परदेशात बसलेल्या गुंड खलिस्तानी फुटीरतावाद्यांना निधी देऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर १०० पेक्षा अधिक ठिकाणी छाप्यांमध्ये एनआयएच्या टीमचे २०० हून अधिक सदस्य सहभागी आहे, अशी माहिती एनआयएच्या सूत्रांनी दिली आहे. जसविंदर सिंग मुलतानी हा एसएफजी संस्थापनक गुरपतवंत सिंह पन्नूचा जवळचा सहकारी असल्याचे मान जाते. गुरपतवंत सिंह यांचा फुटीरतावादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे सांगितले जाते.

First Published on: May 18, 2023 12:12 PM
Exit mobile version