देशात कोरोनाबाधितांची संख्या ७४ लाख पार; मात्र रिकव्हरी रेटही वाढतोय

देशात कोरोनाबाधितांची संख्या ७४ लाख पार; मात्र रिकव्हरी रेटही वाढतोय

India Corona Update:देशात ८० दिवसानंतर आज ६० हजाराहून कमी रुग्णांची नोंद, तर १५७६ मृत्यू

देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ७५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत देशामध्ये ६१ हजार ८७१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून १०३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देथाल ७४ लाख ९४ हजार ५५२ इतके कोरोनाबाधित झाले असून त्यापैकी ७ लाख ८३ हजार ३११ इतके सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत ६५ लाख ९७ हजार २१० जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या १ लाख १४ हजार ०३१ इतकी आहे.

देशात १७ ऑक्टोबर २०२० रोजी पर्यंत एकूण ९ कोटी ४२ लाख २४ हजार १९० इतक्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल, शनिवारी ९ लाख ७० हजार १७३ इतक्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती आयसीएमआरने दिली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून काल, शनिवारी १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचाराखाली असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन १ लाख ८५ हजार २७० एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

हेही वाचा –

मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस सुरु, मुंबई लोकलला मात्र रेड सिग्नल!

First Published on: October 18, 2020 10:12 AM
Exit mobile version