धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होतेय, आरएसएसचे दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य

धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होतेय, आरएसएसचे दत्तात्रय होसबळे यांचं वक्तव्य

प्रयागराज – धर्मांतरामुळे हिंदूंची संख्या कमी होतेय. लोकसंख्येच्या असंतुलनामुळे अनेक देशांमध्ये विभाजनाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय. तसंच, धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासूनच भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

दत्तात्रय होसबळे म्हणाले की, धर्मांतर आणि बांग्लादेशींची घुसखोरी लोकसंख्येच्या असंतुलनास जबाबदार आहे. त्यामुळे धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याची आवश्यकता आहे. लोकसंख्येच्या असंतुलनाचे दुसरे प्रमुख कारण घुसखोरी आहे. उत्तर बिहार, पूर्णिया, कटिहारसारख्या जिल्ह्यात तसेच अनेक राज्यांमध्ये बांग्लादेशीं घुसखोरांचे प्रमाण वाढत आहे.

घरवापसीचे चांगले परिणाम समोर आले आहेत. घर वापसी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रयत्न आहे. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्म स्वीकालेल्या नागरिकांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्यासठी घर वापसी राबवण्यात येत आहे. धर्मांतर रोखण्यासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत. मात्र या कायद्याची सक्तीने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. उत्तरप्रदेश आणि इतर काही राज्यात कोणत्याही आमिषाने किंवा बळजबरीने धर्मांतर करण्यास मनाई आहे. तसेच आरक्षणासाठी धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासून भूमिका आहे, असंही दत्तात्रय होसबळे यांनी पुढे स्पष्ट केलं.

First Published on: October 20, 2022 2:50 PM
Exit mobile version