सलग सहा दिवस कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक 

सलग सहा दिवस कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक 

भारतात सलग सहाव्या दिवशी नवीन कोविड रुग्णसंख्येपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदवली गेली आहे. प्रभावी चाचण्या, शोध, उपचार, सर्वेक्षण आणि सुस्पष्ट संदेश यामुळेच भारतामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २४ तासात देशात ८७,३७४ इतके रुग्ण बरे झाले तर ८६,५०८ जणांना कोविडची लागण झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४६ लाख ७४ हजार ८९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने ८१.५५ टक्क्यांचा आकडा पार केला आहे.

बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असून, त्या तुलनेत सक्रिय रुग्णांची संख्या फारच कमी आहे, देशामध्ये बरे झालेले रुग्ण ४६,७४,९७८ तर  सक्रिय ३,६६,३८२ रुग्णांपेक्षा ३७ लाखांनी जास्त आहे. तसेच सक्रिय रुग्णसंख्या बाधित रुग्णांच्या १६.८६ टक्के इतकी आहे. सक्रिय रुग्णसंख्येत हळूहळू घट दिसून येत आहे. बरे झालेल्या नवीन रुग्णांपैकी ७४ टक्के रुग्ण १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहेत. महाराष्ट्राने १९४७६ प्रकारणांसह सलग सहाव्या दिवशी हे प्रमाण कायम ठेवले आहे.

‘चेस द व्हायरस”चा पाठपुरावा करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या ‘टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ या केंद्राच्या नेतृत्त्वातील कृतीशील धोरणाद्वारे हे शक्य झाले आहे. केंद्राने जारी केलेल्या स्टँडर्ड ऑफ केअर प्रोटोकॉलच्या माध्यमातून उच्च गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवेद्वारे जास्तीत जास्त चाचण्या, त्वरित निरीक्षण आणि ट्रॅकिंगद्वारे लवकरात लवकर रुग्ण शोधत आल्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्र आणि राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारांचे रुग्णालयांमधील सुधारित आणि प्रभावी वैद्यकीय उपचार, गृह अलगीकरणावरील लक्ष, स्टिरॉइड्सचा वावर, अँटिकोआगुलंट्सचा वापर आणि त्वरित आणि वेळेवर उपचार याकरीता रूग्णांसाठी रुग्णवाहिकांच्या सुधारित सेवा यावर सतत लक्ष केंद्रित केले गेले आहे. आशा कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे गृह अलगीकरणामधील प्रभावी देखरेखीचा व रुग्णांच्या प्रगतीचा पाठपुरावा घेणे शक्य झाले आहे. 

‘ईसंजीवनी’ला  मिळाले यश 

‘ईसंजीवनी’ डिजिटल व्यासपीठाच्या माध्यमातून टेलिमेडिसिन सेवा, कोविडचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरल्या आहेत, त्याचबरोबर कोविड नसलेल्या अत्यावश्यक आरोग्य सेवाही उपलब्ध होत आहे. आयसीयूमधील डॉक्टरांच्या क्लिनिकल मॅनेजमेंट क्षमता वाढवण्यावर केंद्राचा भर आहे. एम्स, नवी दिल्लीच्या तज्ञांनी घेतलेल्या ‘नॅशनल ई-आयसीयू ऑन कोविड-१९ मॅनेजमेंट’ उपक्रमामुळे यामध्ये भरीव मदत झाली आहे. २८ राज्ये किंवा  केंद्रशासित प्रदेशात २७८ संस्था आणि उत्कृष्टता केंद्रांमध्ये अशी २० सत्रे घेण्यात आली आहेत.

First Published on: September 24, 2020 3:24 PM
Exit mobile version