पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबली

पेट्रोल-डिझेलची दरवाढ थांबली

पेट्रोल-डिझेलच्या किमती गेले काही दिवस वाढल्या होत्या. त्याची वाढ शुक्रवारी थांबलीय. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यात. रुपयाही मजबूत झालाय. त्यामुळे ऑइल कंपनींनी पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल केले नाहीत. शुक्रवारी ( 19 जुलै ) दिल्लीत 1 लीटर पेट्रोलचा दर 73.35 रुपये आहे. तर डिझेलची किंमत 66.24 रुपये प्रति लीटर झालीय. याशिवाय मुंबई, कोलकत्ता आणि चेन्नई इथे पेट्रोलच्या किमती स्थिर राहिल्यात.

IOC च्या वेबसाइटवर असलेल्या दराप्रमाणे दिल्लीत पेट्रोल 73.35 रुपये आणि डिझेल 66.24 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर मुंबईत वाढलेल्या किमतीनंतर पेट्रोल 78.96 रुपये प्रति लीटर मिळतंय. तर डिझेल 69.43 रुपये प्रति लीटर मिळतंय. कोलकत्तामध्ये पेट्रल 75.77 रुपये आणि डिझेल 68.31 रुपये प्रति लीटर मिळतंय. चेन्नईत पेट्रोल 76.18 रुपये आणि डिझेल 69.96 रुपये प्रति लीटर मिळत आहे.

First Published on: July 20, 2019 4:58 AM
Exit mobile version