आयुर्वेद-ॲलोपॅथी डॉक्टरांचे काम भिन्न; सर्वोच्च न्यायालयाकडून समान वेतनाचा आदेश रद्द

आयुर्वेद-ॲलोपॅथी डॉक्टरांचे काम भिन्न; सर्वोच्च न्यायालयाकडून समान वेतनाचा आदेश रद्द

भारतातील हिंदू धर्माच्या 'संरक्षणा'साठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.

मुंबई | आयुर्वेद डॉक्टर (Ayurveda Doctor)आणि ॲलोपॅथी डॉक्टर (Allopathy Doctor) या दोघांची शासकीय रुग्णालयातील कामे भिन्न असतात. यामुळे दोन्ही श्रेणींतील डॉक्टरांना समान वेतन लागू करण्याचा गुजरात उच्च न्यायालयाचा ( Gujarat High Court) आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रद्द केला आहे. ॲलोपॅथी डॉक्टरांप्रमाणे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा हे आयुर्वेद डॉक्टरांना द्याव्या लागत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीत म्हटले आहे.

गुजरात उच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिलेल्या आदेशानुसार, आयुर्वेद व्यावसायिक हे एमबीबीएस पदवीधारक डॉक्टरांच्या समकक्ष मानले जाण्यास पात्र आहेत. गुजरात उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान निकाल दिला आहे. आयुर्वेद व्यावसायिकांचे महत्त्व आणि स्वदेशी औषध पद्धतीला प्रोत्साहन देणे महत्वाचे असेल, या करिता दोन्ही श्रेणींतील डॉक्टर समान वेतनास उच्च न्यायालयाने पात्र ठरवेल होते. परंतु, या दोघांचे काम सारखे नक्कीच नसते. यामुळे वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही, असा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पुढे म्हटले, “या दोन्ही पद्धतीत ज्या उपचार विज्ञानाचा अवलंब केला जात, त्यांच्या स्वरुप आणि आधुनिक वैद्यकी तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे ॲलोपॅथी डॉक्टर आकस्मित कामे करण्यास सक्षम आहेत. या डॉक्टरांना गंभीर जखमीवर तातडीने उपचार करावे लागतात. ते आयुर्वेदिक डॉक्टर करू शकत नाहीत”, असे न्यायमुर्ती व्ही. रामसुब्रमण्यम आणि न्यायमुर्ती पंकज मित्तल यांच्या खंडपीठाने नमूद केले. एमबीबीएस पदवीधारक डॉक्टर हे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन करू शकतात. तसे आयुर्वेदिक डॉक्टरांना करू शक्य नाही”, अशी टीप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे.

“आयुर्वेद आणि स्वदेशी औषध पद्धतीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, हे मान्य करावे. परंतु, दोन्ही श्रेणींतील डॉक्टर एकसारख्या वेतनास पात्र ठरविण्यासाठी समान पद्धतीचे काम करत नाही, या वस्तुस्थितीकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही”, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

 

First Published on: April 27, 2023 5:04 PM
Exit mobile version