‘देशात येत्या ६ ते ८आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येणार’- डॉ. रणदीप गुलेरिया

‘देशात येत्या ६ ते ८आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येणार’- डॉ. रणदीप गुलेरिया

AIIMS प्रमुख डॉ रणदीप गुलेरिया

देशात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून आता तिसरी लाट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी शनिवारी चिंताजनक वक्तव्य केले आहे. कोरोना साथीच्या तिसरी लाट येत्या ६ ते ८ आठवड्यात देशात येऊ शकते आणि ही लाटेवर नियंत्रण मिळवणं अशक्य असणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मोठी लोकसंख्या असलेल्या देशात सर्वाधिक नागरिकांचे लसीकरण करणे हे मोठे आव्हान असणार आहे. सर्वाधिक लोकांचे लसीकरण झाल्याने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, संरक्षण होणं आवश्यक आहे.

देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू केली असली तरी पुन्हा कोविड प्रोटोकॉलचा अभाव असल्याचे दिसून येत आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटे दरम्यान जे काही घडले यातून आपण काही शिकलो नाही. अनलॉक केल्यानंतर पुन्हा गर्दी वाढत आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात एकत्र होत आहेत. राष्ट्रीय स्तरावर कोरोना रूग्णांची संख्या वाढण्यास थोडा वेळ लागेल. त्यामुळे येत्या पुढील सहा ते आठ आठवडे किंवा त्यापेक्षा काही दिवसांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.

देशातील लोकसंख्येपैकी फक्त ५ टक्के लोकांना आतापर्यंत दोन्ही डोस देण्यात आले आहेत. या वर्षाच्या अखेरीस देशातील १३० कोटी लोकांपैकी १०८ कोटी लोकांना लसी देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे आणि हेच मुख्य आहे. कोरोनाची एक नवीन लाट येण्यासाठी सहसा तीन महिन्यांपर्यंत काळ लागू शकतो, परंतु वेगवेगळ्या घटकांवर हा वेळ अवलंबून असतो. तसेच, कोविड प्रोटोकॉलशिवाय काटेकोरपणे देखरेखीची खात्री करणे आवश्यक आहे. मागील वेळी आम्ही एक नवीन व्हेरिएंट पाहिला जो बाहेरून आला आणि येथे विकसित झाला असल्याचेही गुलेरिया यांनी म्हटले आहे.

First Published on: June 19, 2021 5:30 PM
Exit mobile version