डोक्यात टरबूज घालून गेले चोरी करायला आणि…

डोक्यात टरबूज घालून गेले चोरी करायला आणि…

अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्ये दोन चोर खास पेहराव करत दुकान लुटण्यासाठी एका पोहोचले. या दोन्ही चोरांचा फोटो लुइसा पोलीस विभागाने शनिवारी फेसबूकवर शेअर केला आहे. त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हे दोघेही चोर एक दुकान लुटण्यासाठी काळ्या रंगाच्या टोयोटा गाडीतून आले. त्यांनी तोंडाला मास्क लावण्या ऐवजी डोक्यात टरबूज घालून आले होते, असं पोलिसांनी सांगितलं.

या चोरांचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये या दोन्ही चोरांनी हॅलोविनप्रमाणे, टरबुजावर डोळे तयार केले आणि ते घालून दुकान लुटायला गेले. विशेष म्हणजे या दोघांनी चोरीपूर्वी एका दुसऱ्या दुकानावर फोटो काढला होता. या चोरांचे हे फोटो फेसबूकवर शेअर झाल्यानंतर काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

…आणि चोर पकडले गेले

या दोन्ही चोरांनी चोरीपूर्वी काही तास आगोदर एक फोटो काढला होता. या फोटोत ते ज्या कपड्यांवर आहेत, तेच कपडे त्यांनी चोरी करतानाही घातले होते. एवढंच नाही, तर त्यांनी डोक्यावर टरबुजही घातलेलं होतं. यामुळेच हे चोर अगदी सहजपणे पोलिसांच्या हाती लागले. या चोरांचे फोटो आतापर्यंत पाच हजाराहून अधिक वेळा शेअर करण्यात आले आहेत. तर एक हजाराहून अधिक लोकांनी या फोटोवर कॉमेंट्स केल्या आहेत.


हेही वाचा – सीबीएसईच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; १ ते १५ जुलैदरम्यान होणार परीक्षा


 

First Published on: May 18, 2020 10:02 PM
Exit mobile version