धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना तपासण्यासाठी थर्मल डिटेक्टरचा असाही उपयोग

धक्कादायक! प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना तपासण्यासाठी थर्मल डिटेक्टरचा असाही उपयोग

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी सरकारतर्फे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. करोनावाहक हा परदेशातून व इतर राज्यातून येत असल्याने प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. याचपार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची तपासणी करण्यासाठी थर्मल डिटेक्टर मशीन ठेवण्यात आले आहे. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जो बघून या देशात जर प्रवाशांची अशी तपासणी होत असेल तर करोना रुग्णांचा आकडा घटनार तर नाहीच पण वाढेल एवढे मात्र नक्की असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत.

कारण थर्मल डिटेक्टरचा वापर हा व्यक्तीच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी करतात. यासाठी संबंधित व्यक्तीच्या कपाळाजवळ थर्मल डिटेक्टर नेले जाते. त्याला ताप असेल तर कळते व त्याला गर्दीतून ताबडतोब वेगळे करून त्याची वैद्यकिय तपासणी केली जाते. पण या व्हिडीओमध्ये रेल्वे स्टेशनवर जी व्यक्ती ही तपासणी करत आहे. ते बघून सगळ्यांनाच धक्का बसेल. कारण हे महाशय चक्क खुर्चीवर बसून मोबाईलवर गप्पा मारत दोन हात लांब राहून प्रवाशांच्या दिशेने डिटेक्टर ठेवून अजब तपासणी करत आहेत. या कर्मचाऱ्याचा हा निष्काळजीपणाचा कळस असल्याने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

First Published on: March 21, 2020 5:17 PM
Exit mobile version