लोकसभेच्या पहिल्याच दिवशी ‘या’ सेलिब्रिटींनी घेतली शपथ

लोकसभेच्या पहिल्याच दिवशी ‘या’ सेलिब्रिटींनी घेतली शपथ

या सेलिब्रिटींनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ

१७व्या लोकसभेच्या कामकाजाला आजपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी ५ सेलिब्रिटींनी लोकसभेचा सदस्य म्हणून शपथ घेतली. यामध्ये स्मृती इराणी, मनोज तिवारी, गौतम गंभीर, बाबूल सुप्रियो आणि अभिनेत्री नवनीत कौर राणा यांचा समावेश आहे.

स्मृति इराणी

स्मृति इराणींनी शपथ घेण्यासाठी माईककडे चालण्यास सुरूवात करताच टाळ्याचा कडकडाट झाला. राहूल गांधीच्या अनुपस्थितीतही स्मृति इराणींनी शपथ घेण्यास सुरूवात केल्याने स्मृति इराणींनी शपथ घेण्यास सुरूवात करेपर्यंत टाळ्यांचा कडकडाट होतच होता.

मनोज तिवारी

भोजपूरी सिनेमातील स्टार अभिनेता मनोज तिवारीसुद्धा १७ व्या लोकसभा निवडणूकीत दिल्लीच्या उत्तर-पूर्व जागेवर निवडून आला आहे. मनोज तिवारीनेसुद्धा आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. विशेष म्हणजे मनोज तिवारीने शपथ तोंडपाठ केली होती.

माजी क्रिकेटर गौतम गंभीर

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरने क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. पूर्व दिल्लीमधून निवडून आलेल्या गौतम गंभीरने इंग्रजीतून प्रतिज्ञा घेतली. यावेळी त्याने पांढरा शुभ्र कुर्ता-पायजमा असा पोशाख केला होता.

बाबूल सुप्रियो

केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो हे पश्चिम बंगालमधील असनसोल येथून दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. २०१४ मध्ये बाबूल सुप्रियो पहिल्यांदा निवडून आले होते.

गायक हंस-राज-हंस, खासदार नवनीत कौर राणा यांनीसुद्धा घेतली प्रतिज्ञा

पंजाबमधील सुप्रसिद्ध संगीतकार, गायक हंस-राज-हंस यांनीसुद्धा लोकसभेचा सदस्य म्हणून हिंदीतून प्रतिज्ञा घेतली. तर महाराष्ट्रातील अमरावतीहून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या नवनीत कौर राणा यांनीसुद्धा लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

First Published on: June 17, 2019 9:22 PM
Exit mobile version