तुमच्या फेसबुक पोस्टवर चोरांची नजर!

तुमच्या फेसबुक पोस्टवर चोरांची नजर!

Khalapur : महिलेचे हात बांधून घर केले साफ ; चोरट्यांची चौकमध्ये दहशत

कुठे फिरायला गेलो, हॉटेलला गेलो, कोणाला भेटलो तर लगेच फेसबुकवर स्टेटस आणि फोटो अपलोड करायची अनेकांना सवय असते. पण हिच सवय चंदीगडच्या अनेक लोकांना महागात पडलीये. चंदीगडच्या तीन कुटुंबियांना फिरायला गेल्याचा फोटो फेसबुकवर टाकला आणि त्यांच्या घरावर चोरांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

अशी करायचे चोरी

चंदीगडमध्ये फेसबुकवरचे स्टेटस पाहून चोरी केल्याच्या तीन घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपिंनी चौकशी दरम्यान ही माहिती दिली. बंद घराच्या बाहेर लावलेल्या नेम प्लेटच्या आधारावर फेसबुकवर त्या लोकांचे नाव आरोपी सर्च करायचे. फेसबुकवरील फोटो आणि स्टेटसवरुन ते कुटुंबिय कुठे आहे हे त्यांना माहिती पडायचे. जर ते शहराच्या बाहेर गेले असतील तर त्यांच्या घरात आरोपी चोरी करायचे.

चंदीकडच्या तीन ठिकाणी चोरी

चंदीगडच्या मनीमाजरा सेक्टरमध्ये राहणारे राकेश कुमार उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबियांसोबत थायलंडला फिरायला गेले होते. त्यांच्या फेसबुकवरील स्टेटस आणि फोटो पाहून आरोपींनी त्यांच्या घराचा टाळा तोडून चोरी केली. राकेश कुमार यांच्या घरातील पैसे, मोबाईल, लॅपटॉप आणि एलसीडी चोरांनी लंपास केले. चंदीगडच्या बँक कॉलनीमध्ये रहाणाऱ्या अमित यांनी कुटुंबियांसह शिमलाला फिरायला गेल्याचा फोटो फेसबुकवर अपलोड केला. चोरांनी दुसऱ्या दिवशी त्यांच्या घरात चोरी केली. अमित यांच्या घरामधील दागिणे आणि पैसे चोरीला गेले. तर दुसरीकडे शांतिनगर भागात रहाणआरे दिनेश कुटुंबियांसोबत मथुरा, आगरा फिरायला गेले होते. त्यांना फेसबुकवर फोटो अपलोड केला. त्यांनी आम्ही आगऱ्याला असल्याचा स्टेटस देखील टाकला होता. त्यावरुन चोरांनी त्यांच्या घराला लक्ष्य करत चोरी केली. .

उच्चशिक्षित मुलांनी केली चोरी

मनीमाजरा पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. गेल्या काही दिवसात सोशल वेबसाईट्समुळे चोरीच्या अनेक घटना वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांनी फिरायला गेल्यावर स्टेटस किंवा फोटो सोशल मीडियावर टाकू नये. फिरुन घरी आल्यानंतर फोटो किंवा स्टेटस शेअर करा, असं मनीमाजरा पोलिसांनी सांगितलं आहे. तसंच जर फिरण्यासाठी जाणार असेल तर कोणाला तरी घरी ठेवून जा असं देखील त्यांनी सांगितलं.

First Published on: June 21, 2018 7:32 PM
Exit mobile version