Corona Third Wave : ऑक्टोबरदरम्यान येणारी कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक, IIT कानपूरचा दावा

Corona Third Wave : ऑक्टोबरदरम्यान येणारी कोरोनाची तिसरी लाट कमी धोकादायक, IIT कानपूरचा दावा

मुंबईत कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २ वर, दीड वर्षात सर्वात कमी मृत्यू दर

देशात कोरोना विषाणूची दुसरी महाभयंकर लाट संपत नाही तोवर तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान आरोग्य यंत्रणेची कोलमडलेली स्थिती पाहता अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये अशीच प्रार्थना सगळेचं जण करतायंत. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्यत्या उपययोजना राबवल्या जात आहेत. अशातचं आयआयटी कानपूरच्या प्राध्यपकांनी एक दिलासाजनक माहिती जाहीर केली आहे. कोरोनाच तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षा कमी प्राणघातक असेल असा दावा आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी गणित विषयातील विश्लेषणाच्या फॉर्म्युल्याच्या आधारे केला आहे. दरम्यान ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान ही तिसरी लाट येण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचे मूल्यांकन करण्यासाठी आम्ही गेला महिनाभर एका मॉडेलवर काम करत होतो. यातून असे दिसून आले की, कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेप्रमाणे घातक आणि प्रभावी नसेल. यात तीन शक्यताही समोर आल्या एक म्हणजे ऑगस्टच्या अखेरीस एखादा नवीन व्हेरियंट येऊन तो डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरले, तर दुसरं म्हणजे ऑक्टोबर -नोव्हेंबरदरम्यान तिसरी लाट येईल. त्यानुसार तिसरी लाट पहिल्या लाटेप्रमाणे असेल. अशी माहिती आयआयटी कानपूरटे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी दिली.

यात डेल्टा व्हेरियंटमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट पसरण्यास सुरुवात होईल अशी शक्यता कमी आहे. कारण डेल्टा व्हेरियंटपेक्षा वेगाने पसरणाऱ्या एका नव्या कोरोना विषाणूमुळे कोरोनाची तिसरी लाट येणाऱ्याची शक्यता अधिक आहे. अशा दोन्ही गोष्टींचा विचार होत आहे, यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना संसर्ग झालेले बहुतांश लोक बरे झाले. परंतु काहींची प्रतिकारशक्ती कमी झाली. अशी माहिती गेल्या अभ्यास समोर आली. 5 ते 20 टक्के लोकांची प्रतिकारशक्ती कोरोनाचा सामना करण्यासाठी संपली आहे. ज्यामुळे त्यांना पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आहे. असेही प्रोफेसर अग्रवाल म्हणाले.


 

First Published on: July 20, 2021 9:58 AM
Exit mobile version