बाप रे! जगातील सर्वांत उंचीवरील शिव मंदिर झुकले; जोशीमठानंतर यंत्रणा सावध

बाप रे! जगातील सर्वांत उंचीवरील शिव मंदिर झुकले; जोशीमठानंतर यंत्रणा सावध

नवी दिल्ली | जगातील सर्वांत उंचीवर असलेले तुंगनाथ शिव मंदिर ( Tungnath Shiva Temple) झुकू लागल्याची माहिती आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने (ASI) केलेल्या निरीक्षणात ही बाब समोर आली आहे. या माहितीमुळे एएसआयचे तज्ञही टेन्शनमध्ये आले आहेत. तुंगनाथ शिव मंदिर हे उत्तराखंडमध्ये आहे. या मंदिरात ५ ते ६ अंशानी मंदिर झिकले आहे.  या मंदिरात मूर्ती आणि छोट्या छोट्या संरचना १० अंशांपर्यंत झुकल्या आहेत. यासंदर्भात केंद्र सरकारला माहिती दिली असून या मंदिराला संरक्षित इमारत म्हणून जाहीर करण्याची मागणी तज्ञांनी केली आहे. जोशीमठाच्या प्रकरणानंतर यंत्रणा सावध झाली असून आता केंद्र सरकार काय पाऊल टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

एएसआयच्या डेहराडून सर्कलचे अधीक्षक पुरात्वशास्त्रज्ञ मनोज कुमार सक्सेना यांनी म्हटले की, तुंगनाथ मंदिर झुकण्याचे आणि नुकसानीचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. यानंतर शक्य असल्यास दुरुस्ती करू. या मंदिर परिसराची पाहाणी करून सविस्तर रुपरेषा तयार करण्यात येणार आहे. या मंदिराच्या जमिनीचा खालचा भाग घसरण्याची किंवा कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. मंदिराची पायाभरणी मजबूत करण्यात येईल, अशी माहिती तज्ञांनी दिली आहे. मंदिराचा झुकलेला कोण मोजण्यासाठी एएसआयने काचेचे स्केल बसविले आहे. यानुसार मंदिराची सातत्याने मोजणी केली जणार आहे.

तुंगनाथ शिव मंदिर जगातील सर्वात उंच मंदिर 

तुंगनाथ शिव मंदिराला जगातील सर्वात उंच शिव मंदिराचा दर्जा देण्यात आला आहे. हे मंदिर कत्युरी शासकांनी बांधले असून बद्र केदार मंदिर समितीच्या प्रशासनाखाली येते. हे मंदिर झुकण्यासंदर्भात बीकेटीसीला पत्रही पाठवण्यात आले आहे. मंदिरला पुन्हा मूळ स्वरुपात आणण्यासाठी आम्ही एएसआयला मदत करण्यास तयार आहोत. परंतु, मंदिर पूर्णपणे ताब्यात देण्यास तयार नसल्याचे बीकेटचे चेअरमन अजेंद्र अजय यांनी टाइम्सला सांगितले.

 

First Published on: May 17, 2023 1:19 PM
Exit mobile version