अबब… या महिलेला करायचे आहे चादरीशी लग्न

अबब… या महिलेला करायचे आहे चादरीशी लग्न

चादरीवर प्रेम करणारी महिला पास्केल सेलिक

माणूस प्रेम कोणावर करेल याचा काही नेम नाही. आतापर्यंत माणूस हा प्राण्यांवर प्रेम किंवा वस्तूंवर प्रेम करत होता. मात्र त्यांच्याशी लग्न करण्याची एक वेगळीच इच्छा एका महिलेनी व्यक्त केली आहे. अशा अनैसर्गिक प्रेमाच्या इच्छेच्या घटनांमुळे लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो आहे. अशीच एक घटना युकेमध्ये समोर आली आहे. युनायटेड किंगडम (युके) येथील डेव्हॉन येथे राहणाऱ्या पास्केल सेलिक या महिलेला आपल्या चादरीशी प्रेम झाले आहे. मागील अनेक वर्षांपासून हे प्रेमसंबध सुरु असून आता या महिलेचा या चादरीशी चक्क लग्न करायचे आहे. तिच्या अशा इच्छेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

लग्नाला अशी तयार होणार नवरी

याहू न्यूजने दिलेल्या माहितीनुसार ही महिला आपल्या लग्नाला नाइट ड्रेस घालणार आहे. साधारणतः लग्नाच्या प्रत्येक मुलगी नटलेली असते. मात्र पास्केल सेलिकला नाइट ड्रेसवरच लग्न करायचे आहे. लग्नाला येणाऱ्या पाहूण्यांनाही तिने नाइट ड्रेस घालून येण्यास सांगितले आहे. पाहूण्यांनी येतांना गरम पाण्याची बाटली आणायला हवी अशी विनंती तिने केली आहे. 

“माझी चादर ही लांब, खंबीर, अतरंगी आणि विश्वासार्ह आहे. माझी चादर नेहेमी माझ्या जवळ असते. ती मला मिठीत घेते आणि मी माझ्या चादरीवर खूप प्रेम करते.” – पास्केल सेलिक, चादरीवर प्रेम करणारी महिला

First Published on: January 24, 2019 9:05 AM
Exit mobile version