NisargCyclone : गुजरात किनारी भागातून हजारोंना सुरक्षित स्थळी हलवलं!

NisargCyclone : गुजरात किनारी भागातून हजारोंना सुरक्षित स्थळी हलवलं!

प्रातिनिधिक छायाचित्र

एकीकडे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ येत्या काही तासांमध्ये धडकण्यासाठी वेगाने पुढे सरकत असतानाच त्याचा पुढचा संभाव्य प्रवास लक्षात घेता गुजरातच्या किनारी भागातल्या प्रशासकीय यंत्रणेने देखील आवश्यक ती पावलं उचलली आहेत. गुजरातच्या किनारी भागातून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. त्यासोबतच, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे निर्देश देण्यात आले असून एनडीआरएफ आणि इतर बचाव पथकांना सज्ज ठेवण्यात आलं आहे. निसर्ग चक्रीवादळ गुजरातमध्ये न जाता मध्य भारताकडे सरकणार असलं, तरी वादळी वारे आणि मुसळधार पाऊस याचा बसणारा फटका लक्षात घेता त्या दृष्टीने प्रशासकीय यंत्रणांनी तयारी केली आहे.

निसर्ग चक्रीवादळ कोकण आणि मुंबई किनारपट्टीवरून पुढे मध्य भारताकडे सरकणार आहे. मात्र, गुजरात-महाराष्ट्र सीमेवरच्या वलसाड आणि नवसारी या किनारी भागांमध्ये देखील त्याचा प्रभाव जाणवू शकतो. त्यामुळे वलसाडमधल्या ३५ गावांमधल्या १०००० नागरिकांना तर नवसारीमधल्या १२ गावांमधल्या १०२०० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आत्तापर्यंत किनारी भागांमध्ये NDRFच्या १४ टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

First Published on: June 3, 2020 12:02 PM
Exit mobile version