पटनचेरु येथून एकाच दिवशी ३ मुली बेपत्ता!

पटनचेरु येथून एकाच दिवशी ३ मुली बेपत्ता!

प्रातिनिधीक फोटो

तेलंगणामध्ये एकाच दिवशी ३ मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही घटना तेलंगणामधील सांगरेड्डी जिल्ह्यातील आहे. या घटनेतील २ मुली विद्यार्थिनी आहेत, तर १ मुलगी कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडली होती. परंतु अधिक उशीर होऊनही ते घरी परतलेच नाहीत. यामुळे सांगरेड्डी तालुक्यातील स्थानिक लोकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेलंगणातील स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुला स्रवांठी (१७) आणि गायत्री (१७) या दोघी पटनचेरु येथील महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. शिवानी (२४) ही सॉफ्टवेअर कंपनीत कार्यरत आहे. परंतु या तिघीजणी संध्याकाळी उशीर होऊनही घरी परतल्याच नाहीत. म्हणून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. परंतु, अधिक शोध घेऊनही त्यांच्यापैकी एकाही मुलीचा पत्ता लागला नाही. शेवटी त्यांच्या पालकांनी पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे, या तिघीही पटनचेरु परिसरातून बेपत्ता झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. स्थानिक पोलीस या तिघींचा तातडीने शोध घेत आहेत. तसेच त्यांच्या मित्र, परिवार यांची कसून चौकशी करत आहे.

First Published on: June 13, 2019 9:07 AM
Exit mobile version