दिल्लीत टिकटॉक सेलिब्रेटीची गोळ्या झाडून हत्या

दिल्लीत टिकटॉक सेलिब्रेटीची गोळ्या झाडून हत्या

दिल्लीत टिकटॉक सेलिब्रेटीची गोळ्या झाडून हत्या

दिल्लीत एका टिकटॉक सेलिब्रेटीवर तीन इसमांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव मोहित मोर असे आहे. मोहित मोर हा तरुण एक जिम ट्रेनर होता. तो २७ वर्षांचा होता. मोहित हा नवी दिल्लीच्या नजफगढ येथील एका फोटो स्टूडिओच्या दुकानात गेला होता. दरम्यान, आरोपींनी फोटो स्टूडिओमध्ये शिरुन त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात मोहितचा मृत्यू झाला. परिसरातील आजूबाजूच्या दुकानांच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये आरोपींचे फोटो पोलिसांना मिळाले आहेत.

टिकटॉकवर मोहितचे पाच लाख फॉलोअर्स

पोलिसांनी मोहितचा मृतदेह ताब्यात घेतला असून मृतदेह शवच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मोहित हा सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह होता. त्याचे टिकटॉकवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. याशिवाय तो स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरही व्हिडिओ टाकायचा. मोहित हा हरियाणाच्या बहादुरगढ येथील रहिवासी होता.

दुकानदाराने पळ काढत गाठले पोलीस स्टेशन

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास तो शनि मंदिर गल्लीतील फोटो स्टोडिओमध्ये गेला होता. त्याने दुकानदाराला काही कागदपत्रे दिले आणि तो सोफ्यावर बसला. या दरम्यान हल्लेखोर दुकानात शिरले. दोन हल्लेखोरांनी हेल्मेट घातले होते. तिसरा दुकानाच्या बाहेर उभा होता. दोघांनी मोहितवर गोळीबार केला. या गोळीबारादरम्यान घाबरलेल्या दुकानदाराने दुकानातून पळ काढत पोलीस स्टेशन गाठले. पोलीस याप्रकरणाचा छडा लावत आहेत. आपसातील मतभेदातून हा वाद झाल्याची शक्यता वर्तवील जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहे.

First Published on: May 22, 2019 10:28 AM
Exit mobile version