ममताजींचे निवडणूक आयोगाला पत्र; पंतप्रधानांच्या देवदर्शनावर घेतला आक्षेप

ममताजींचे निवडणूक आयोगाला पत्र; पंतप्रधानांच्या देवदर्शनावर घेतला आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी,ममता बॅनर्जी

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केदारनाथला रुद्राभिषेक करत गुहेत ध्यानधारणा केली. केदारनाथपाठोपाठ बद्रीनाथाच्या चरणीही पंतप्रधानांनी डोके टेकले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलेलं आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेवर आहेत मात्र या यात्रेला मीडियाकडून मोठ्या प्रमाणात कव्हरेज मिळत आहे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे, असं लिहिण्यात आलं आहे.

दौऱ्याला मीडियामधून प्रचंड प्रसिद्धी

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार संपलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ यात्रेला गेले आहेत आणि गेल्या दोन दिवसांपासून या दौऱ्याला मीडियामधून प्रचंड प्रसिद्धी दिली जात आहे. शिवाय प्रचारबंद असताना मोदींनी मीडियाशी संवादही साधला आहे. तसेच केदारनाथच्या विकासाच्या मास्टर प्लानचीही घोषणा केली आहे. हे आचारसंहितेचं मोठं उल्लंघन आहे, त्यामुळे यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तृणमूलने या चिठ्ठीतून केली आहे.

मोदींचा केदारनाथ दौरा 

शनिवारी सकाळी मोदी उत्तराखंडला पोहोचले. त्यानंतर तिथून ते केदारनाथमध्ये दाखल झाले. मोदींचा गेल्या पाच वर्षांमधला हा चौथा केदारनाथ दौरा आहे. मोदींनी मंत्रोच्चरात विशेष पूजा केली. पुजाऱ्यांनी त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ घातली आणि चंदनाचा टिळा लागला. त्यानंतर पंतप्रधानांनी मंदिरात बराच काळ साधना केली. मोदींनी मंदिराला प्रदक्षिणा घालत उपस्थित भाविकांना अभिवादनही केलं. यावेळी मोदींनी खास गढवाली वस्रे परिधान केली होती. नरेंद्र मोदी यांनी केदारनाथ येथील शिवशंकराच्या मंदिरात पूजा केली. त्यानंतर नरेंद्र केदारनाथ परिसरात सुरू असलेल्या विकासकार्यांचाही आढावा घेतला. त्यानंतर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी बद्रीनाथाच्या दर्शनासाठी पोहचले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ आणि बद्रीनाथाची धार्मिक यात्रा करण्यासाठी गेले आहेत


Loksabha Election Live Update : पहिल्या दोन तासात बिहारमध्ये सर्वाधीक मतदान


First Published on: May 19, 2019 11:57 AM
Exit mobile version