Lockdown – खासदार अपरूपा पोद्दार यांनी मुलीचे नाव ठेवले ‘कोरोना’,कारण….

Lockdown – खासदार अपरूपा पोद्दार यांनी मुलीचे नाव ठेवले ‘कोरोना’,कारण….

कोरोना व्हायरसचा परिणाम संपूर्ण जगावर आहे. अशा काळात अनेकजण आपल्या मुलांची नावही कोरोना व्हायरसशी संबंधीतच ठेवत आहेत. अनेकांनी आपल्या मुलांच नाव कोरोना, लॉकडाऊन असं ठेवलय. तृणमूल काँग्रेसच्या सदस्य अपरूपा पोद्दार यांनी देखील आपल्या मुलीचं नाव कोरोना ठेवलं आहे.

त्यांचे पती मोहम्मद शकीर अली म्हणाले की, आम्ही मुलीला आणि सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणत्या कठीण परिस्थितीत मुलीचा जन्म झाला आहे. त्यावेळी आपल्याला कोरोनाच्या सारख्या व्हायरसमुळे कोणत्या कठीण परिस्थीतीचा सामना करावा लागला होता. सध्या संपूर्ण जग या कोरोनाशी लढत आहे. आपल्याला कोरोनाला घाबरवायचं नाही तर त्याच्याशी लढायचं आहे.

गुरुवारी अरामबागच्या खासदाराने हुगळी जिल्ह्यातील खासगी नर्सिंग होममध्ये आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. रिसडा नगरपालिकेचे टीएमसीचे नगरसेवक अली म्हणाले की, आम्ही मुलीचे निकनेम कोरोना ठेवलं आहे. ही परिस्थिती उद्या चांगल्या स्थितीत बदलेल, परंतु त्याचे नाव लोकांना या कठीण काळाची आठवण करून देईल. ‘

अली म्हणाले की अल्लाहची इच्छा आहे की जगातून कोरोना विषाणूचे लवकरात लवकर निर्मूलन व्हावे. ते म्हणाले की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आई आणि मुलाच्या आरोग्याबद्दल विचारपूस केली. ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुलीचे नाव सुचवावे अशी मी विनंती केली आहे. या मुलीचे मुख्य नाव मुख्यमंत्री ठेवतील. या जोडप्याला यापूर्वी सहा वर्षाची मुलगी होती. अपरुपा आणि अलीचे २००७ मध्ये लग्न झाले होते.


हे ही वाचा – Lockdown – कौटुंबिक हिंसाचारात वाढ, विवाहितेची आत्महत्या!


 

First Published on: May 8, 2020 8:15 PM
Exit mobile version