Today Gold Rate: सोन्याचे दर पून्हा घसरले, जाणून घ्या आजचा दर

Today Gold Rate: सोन्याचे दर पून्हा घसरले, जाणून घ्या आजचा दर

लग्नसराईच्या दिवसांत सोन्याचा भाव थेट 71 हजारांवर; चांदीही महागली

गेल्या काही दिवसांपासून भारतात सोने, चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या मोसमात सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांसाठी खरेदीसाठी सुवर्ण संधी तयार झाली आहे. कारण चालू महिन्यात कमॉडिटी बाजारात सोन्याचे दर आत्तापर्यंत १८०० रुपयांनी खाली आले आहेत. तर आज सराफा बाजारातही सोन्याच्या दरात ७६० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर ४४००० रुपये झाला आहे.

gold returns या वेबसाईटच्या माहितीनुसार, मुंबईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४४००० रुपयांपर्यंत पोहचला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४३००० रुपयांवर पोहचला आहे. त्यामुळे शुक्रवारचा विचार केला असता सोन्याच्या दरात १६० रुपयांची घसरण झाली आहे. त्यात शुक्रवारीच्या तुलनेत आत आज सोन्याचा दर ७६० रुपयांनी घसरला आहे. दिल्ली आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४८०५० रुपये आहे तर २२ कॅरेट सोने ४४०५० रुपयांवर पोहचले आहे. चेन्नईत २४ कॅरेट सोन्याचा दर ४६१७० रुपये तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४२३२० रुपयांवर पोहचला आहे. तर कोलकत्तामध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६९०० रुपये झाला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचे दर ४४१८० रुपये झाला आहे. त्यामुळे चालू महिन्यात सोने १८०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. यातच ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या दराने उच्चांक गाठला होता. परंतु ऑगस्ट तुलनेत सोन्याचे दर ११००० रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

देशात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असतानाच सोने व्यावसायिकांनी सावध पवित्रा घेतला आहे. त्यामुळे सोन्याचे दर कमी असतानाही ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असून किंमत दिवसेंदिवस घसरत आहे. परंतु येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 

First Published on: March 27, 2021 8:14 PM
Exit mobile version