सोनं खरेदी करताय? जाणून घ्या आजचा दर

सोनं खरेदी करताय? जाणून घ्या आजचा दर

Gold Price Today

गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत होती. त्यामुळे सोन्याचे दर कधी कमी होणार याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागले होते. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून सोन्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. सोनं जवळपास या आठवड्यात १ हजार ४६० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर चांदीच्या दरात देखील मोठी घसरण झाली आहे. तर आगामी काळात सोन्याचे दर आणखी घसरतील असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे.

सोन्याचा आजचा दर?

पहिल्यांदाच सोने प्रती तोळा ४५ हजारच्या खाली आले आहे. सध्या सोन्याचा दर ४४ हजार ५०० रुपये इतका झाला आहे. तर चांदी प्रती किलो ६५ हजार रुपये झाली आहे. चांदीच्या दरात देखील कमालीची घसरण झाली आहे. १ ते ६ मार्च दरम्यान सोन दीड हजार तर चांदी ३ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. तसेच आगामी काळात हे दर आणखी कमी होत ४२ हजार रुपये प्रती तोळापर्यंत जातील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ३७० रुपयांनी खाली आला होता. तर सराफा बाजारामध्ये सोन्याचा भाव ४४ हजारांखाली घसरला होता. गोल्ड रिटन्स या वेबसाईटनुसार मुंबईत गेल्या दोन दिवसांपूर्वी २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३ हजार ९०० रुपये होता. तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४ हजार ९०० रुपये येऊन स्थिरावला होता. तसेच दिल्लीत सोन्याचा भाव हा ४३ हजार ९५० रुपये इतका झाला होता.


हेही वाचा – ‘मनसे’चा वर्धापन दिन सोहळा कोरोनामुळे रद्द; सदस्य नोंदणी होणार ऑनलाईन


 

First Published on: March 7, 2021 3:18 PM
Exit mobile version